Tarun Bharat

रणजी क्रिकेट स्पर्धा डिसेंबरपासून,

इराणी, दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा रद्द

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने 201-22 च्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामातील वेळापत्रक जाहीर केले असून येत्या सप्टेंबरमध्ये सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेने या हंगामाला प्रारंभ होत आहे. येत्या डिसेंबरमध्ये रणजी स्पर्धेने प्रारंभ होत आहे. दरम्यान इराणी आणि दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा यावर्षी रद्द करण्यात आल्या आहेत.

गेल्यावर्षी कोरोना महामारी समस्येमुळे रणजी क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आली होती पण 2021-22 च्या कालावधीतील होणाऱया क्रिकेट हंगामासाठी बीसीसीआयच्या स्पर्धा वेळापत्रक समितीने दुलीप करंडक, देवधर करंडक आणि इराणी करंडक क्रिकेट स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या विभागातील पाच स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी बीसीसीआयच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करूनच वरील निर्णय घेतला आहे. 2020-21 च्या क्रिकेट हंगामामध्ये कोरोना माहामारी समस्येमुळे मुश्ताक अली करंडक टी-20 आणि विजय हजारे करंडक वनडे अशा केवळ दोन राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे महिला क्रिकेटपटूंसाठी वनडे क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली होती.

सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट झपाटय़ाने पसरत असली तरी या चालू हंगामात विविध वयोगटातील पुरूष आणि महिलांच्या क्रिकेट स्पर्धा भरविण्याची आशा बीसीसीआयने व्यक्त केली आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये भारतात आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. त्यानंतर पुढील वर्षीच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी क्रिकेटपटूंचा लिलाव करण्यात येणार आहे. मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धा  सप्टेंबरच्या मध्यापासून ते ऑक्टोबरपर्यंत घेतली जाणार असून त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धा होणार आहे.

गेल्यावर्षी कोरोना समस्येमुळे देशातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठेची रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा तब्बल 87 वर्षांनंतर पहिल्यांदाच रद्द करावी लागली. आता आगामी हंगामात रणजी स्पर्धा डिसेंबर ते मार्च दरम्यान खेळविण्याची योजना आखण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुरूष आणि महिलांच्या 23 वर्षाखालील त्याचप्रमाणे 19 वर्षा खालील वयोगटातील स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा गेल्यावर्षी रद्द करण्यात आल्या आहेत. पुढीलवर्षी होणाऱया आयसीसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करणे सोपे व्हावे यासाठी 19 वर्षाखालील वयोगटाची वनडे चँलेजर्स क्रिकेट स्पर्धा तसेच कुचबिहार करंडक आणि विनू मंकड करंडक क्रिकेट स्पर्धेतील क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा आढावा घेतला जातो. महिलांच्या विभागात टी-20, वनडे चँलेजर्स तसेच 23 वर्षांखालील आणि 19 वर्षांखालील वयोगटाच्या स्पर्धा घेतल्या जाणार नाहीत.

बीसीसीआयचे राष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रक पुढीलप्रमाणे

वरिष्ठ पुरूष- सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धा सप्टेंबर ते ऑक्टोबर 2021, विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धा- नोव्हेंबरमध्ये, रणजी करंडक  (प्रथमश्रैणी)

23 वर्षाखालील पुरूष गट- राष्ट्रीय वनडे क्रिकेट स्पर्धा ऑक्टोबर- नोव्हेंबर, सी.के.नायडू करंडक क्रिकेट स्पर्धा डिसेंबर 2021 ते मार्च 2022.

19 वर्षाखालील वयोगट- विनू मंकड वनडे क्रिकेट स्पर्धा ऑक्टोबरमध्ये, वनडे चँलेजर्स क्रिकेट स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात, कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धा नोव्हेंबर 2021 ते जानेवारी 2022.

16 वर्षांखालील वयोगटासाठी- विजय मर्चंट करंडक क्रिकेट स्पर्धा ऑक्टोंबर- डिसेंबर दरम्यान.

वरिष्ठ महिलांसाठी टी-20 लीग क्रिकेट स्पर्धा ऑक्टोंबर ऑक्टोबरमध्ये, वनडे लीग क्रिकेट स्पर्धा नोव्हेंबरमध्ये, 23 वर्षाखालील महिलांची टी-20 लीग स्पर्धा डिसेंबरमध्ये, 23 वर्षाखालील महिलांची वनडे लीग स्पर्धा जानेवारी 2022 मध्ये.

19 वर्षाखालील महिलांची टी-20 लीग स्पर्धा जानेवारी 2022 मध्ये, 19 वर्षाखालील वनडे लीग क्रिकेट स्पर्धा मार्च 2022 च्या शेवटच्या आठवडय़ात, आंतर विभागीय विद्यापीठ क्रिकेट स्पर्धा, विजय हजारे करंडक पुरूषांची क्रिकेट

स्पर्धा एप्रिल 2022 मध्ये.

Related Stories

वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी

Patil_p

विंडीजकडून लंकेचा वनडे मालिकेत ‘व्हाईट वॉश’

Patil_p

गुजरात जायंट्सचा हरियाणा स्टीलर्सवर विजय

Patil_p

झुंजार फलंदाजीनंतरही भारत पराभूत

Patil_p

डय़ुरँड चषक फुटबॉल स्पर्धा कोलकातामध्ये

Patil_p

विंडीजच्या वनडे, टी-20 संघांची घोषणा

Patil_p