Tarun Bharat

रणजी सामन्यात कुशाग्रचे द्विशतक

वृत्तसंस्था/ कोलकाता

येथे सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील बाद फेरीच्या सामन्यात रविवारी खेळाच्या दुसऱया दिवशी झारखंडचा 17 वर्षीय यष्टीरक्षक आणि फलंदाज कुमार कुशाग्रने नागालँडविरूद्ध दणकेबाज द्विशतक (266) झळकविले. त्याच्या कामगिरीमुळे झारखंडने पहिल्या डावात 177 षटकांत 9 बाद 769 धावा जमविल्या.

या सामन्यात झारखंडने 5 बाद 402 या धावसंख्येवरून खेळाला पुढे प्रारंभ केला. कुशाग्रने 269 चेंडूत 2 षटकार आणि 37 चौकारांसह 266 धावा झळकविल्या. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील त्याचे हे पहिले शतक आहे. 2020 साली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर गेलेल्या भारताच्या 19 वर्षांखालील युवा संघामध्ये त्याचा समावेश होता. झारखंड संघातील शाबाज नदीमने 223 चेंडूत 1 षटकार 14 चौकारांसह नाबाद 123 धावा झळकविताना कुशाग्रसमवेत सातव्या गडय़ासाठी 166 धावांची भागिदारी केली. कुशाग्रने 213 चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. झारखंड संघातील विराट सिंगने शानदार 107 धावांचे योगदान दिले. नागालँडतर्फे के लामतूर आणि आय लामतूर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

झारखंड प. डाव 177 षटकांत 9 बाद 769 (कुमार कुशाग्र 266, नदीम खेळत आहे 123, विराट सिंग 107)

Related Stories

आय लीग स्पर्धा सहा आठवडे स्थगित

Patil_p

जर्मनीतील स्पर्धेत लक्ष्य सेनला उपविजेतेपद

Patil_p

रोहित शर्माचे 500 षटकार

Amit Kulkarni

महिला लीग फुटबॉल स्पर्धा ओडिशामध्ये

Patil_p

आगामी प्रो लिग हॉकी पात्रतेसाठी कर्णधार सविताचे

Patil_p

रवि दहिया आज सुवर्णपदकासाठी लढणार!

Patil_p
error: Content is protected !!