Tarun Bharat

रतन टाटांनी पुन्हा जिंकली मनं! पुण्यात येऊन घेतली आजारी कर्मचाऱ्याची भेट

ऑनलाईन टीम / पुणे : 


प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेल्या टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांचे नाव नेहमीच चांगल्या कामामुळे चर्चेत असते. कोविड काळात टाटांनी केलेल्या मदतीचे कौतूक झाले होते. संकटकाळात मदतीसाठी धावून जाणाऱ्या रतन टाटांनी पुन्हा एकदा सगळ्यांची मनं जिंकली आहे. कंपनीतील निवृत्त कर्मचारी आजारी असल्याचे कळाल्यानंतर टाटांनी थेट पुणे गाठले आणि भेटून प्रकृतीची विचारपूस केली.


लिंक्डइनवर एका व्यक्तीने केलेल्या पोस्टमुळे टाटांचे संवेदनशील व्यक्तिमत्व समोर आले आहे. टाटा कंपनीत कार्यरत असलेला एक सेवानिवृत्त कर्मचारी मागील दोन वर्षांपासून आजारी आहे. या कर्मचाऱ्याच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी रतन टाटा मुंबईहून पुण्याला गेले आणि माजी कर्मचाऱ्याची भेट घेतली. त्यांच्या या भेटीचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. यावेळी टाटांना कर्मचाऱ्याच्या प्रकृतीची चौकशी केली. त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबाचा आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचं आश्वासन माजी कर्मचाऱ्याला दिले. कोणताही गाजावाजा न करता, कोणतीही सुरक्षा न घेता, सर्वसामान्य माणसाप्रमाणे रतन टाटांनी माजी कर्मचाऱ्याचे घर गाठले आणि सुखद धक्का दिला. 


त्यांच्या या भेटीमुळे माजी कर्मचारीही भारावून गेला. त्याचबरोबर नेटकऱ्यांनी टाटांचं कौतुक केलं. टाटांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवला असल्याची भावना नेटकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Related Stories

मनसुख हिरेन हत्या प्रकरण ; पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक

Archana Banage

भारतात लवकरच दाखल होणार ‘राफेल’ विमानांची दुसरी तुकडी

Tousif Mujawar

अमोल कोल्हेंनी शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच संजय राऊतांची घेतली भेट, ट्वीट करत म्हणाले…

Archana Banage

सांगलीवाडीत नागरी वस्तीत शिरलेली अजस्त्र मगर पकडली

Archana Banage

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल; दुसरा अर्ज कोणाचा? वाचा सविस्तर…

Archana Banage

MPSC ने सुरु केलं ट्विटर हँडल, अवघ्या २४ तासात टीकेचा भडीमार

Archana Banage