Tarun Bharat

रताळय़ांचा लिलाव न करताच आपसात विक्री

शेतकरीवर्गाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप

वार्ताहर / कंग्राळी खुर्द

बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रताळी आवकेला सुरुवात होऊन जवळपास महिन्याचा कालावधी लोटला आहे. आवक प्रारंभीचा भाव 2000 रुपये होता. आजपर्यंत सुमारे 10 हजार पोती रताळी आवक झाली आहे. सुरुवातीला रताळी पिकाला चांगला भाव मिळत असल्याने रताळी उत्पादकातून समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र, व्यापारीवर्गाच्या आडमुठेपणामुळे कोरोना धास्तीचा आसरा घेत रताळय़ाचा लिलाव न करताच आपसात विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांचे नुकसान होत असल्याचा आरोप रताळी उत्पादकांतून करण्यात येत आहे.

बेळगाव बाजारपेठ रताळी उत्पादनात देशात अव्वल

बेळगाव, खानापूर, चंदगड तालुक्मयामध्ये रताळी पिकाचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. जून, जुलैमध्ये या पिकाची लागवड करण्यात येते. सप्टेंबर ते शिवरात्रीपर्यंत रताळी मोठय़ा प्रमाणात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. सण, व्रत, उपवास या कालावधीत उपवासासाठी मोठय़ा प्रमाणात रताळय़ाचा वापर करण्यात येतो. शिवाय रताळय़ाचे दर आवाक्मयात असतात. त्यामुळे सर्वसामान्य लोक याचा सर्रास उपयोग करतात. रताळी प्रामुख्याने दिल्ली, मुंबई, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आदी शहरात याला मोठी मागणी असते. रताळी उत्पादित क्षेत्रातील शेतकरी बांधवांची आर्थिक बाजू उंचावण्यास रताळी पिकाचे मोठे योगदान आहे.

व्यापारीवर्गाचा आडमुठेपणा

देशात कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात झाला आहे. तो आटोक्मयात आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती खबरदारीचा उपाय म्हणून महिन्याभरापूर्वी कांदा व्यापारी बांधवांना रताळी सवाल करू नये, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र, शेतकरीवर्गाचे होणारे नुकसान लक्षात घेऊन कांदा व्यापारीवर्गाने याकडे दुर्लक्ष केले आणि शेतकऱयांच्या हितासाठी कांदा, बटाटा लिलाव करूनच विक्री करण्यात येत आहे. मात्र, त्याच बाजारपेठेत रताळी उत्पादकांवर मात्र अन्याय होत असल्याचा आरोप शेतकरी बांधवांतून करण्यात येत आहे.

बाजार समितीने गंभीर दखल घ्यावी

तरी बाजार समिती प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन रताळय़ाची विक्री लिलावाद्वारे करण्यास व्यापारीवर्गाला भाग पाडावे. कांदा खरेदीदारांच्या चढाओढीत रताळी पिकाला चांगला भाव मिळणार असल्याचे रताळी उत्पादकांचे म्हणणे आहे.

Related Stories

सामाजिक अंतर राखण्याची सूचना कुणासाठी ?

Patil_p

भडकल गल्लीतील पाणीसमस्या गंभीर

Amit Kulkarni

खानापूर शहर-तालुक्यात दीपावली उत्साहात साजरी

Amit Kulkarni

न्यायालयाच्या आदेशानुसारच नियम लागू करा

Amit Kulkarni

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

mithun mane

ओमकारनगरमध्ये दूषित पाणी पिण्याची वेळ

Amit Kulkarni