Tarun Bharat

रत्नागिरीतही आढळले मृत कावळे

नागरिकात खळबळ, नगर परिषदेची आरोग्य विभाग यंत्रणा सतर्क

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शहरातील आठवडा बाजार परिसरात टिटवीसारखे दिसणारे 3 पक्षी आणि पंधरामाड येथे एका वाडीत 2 कावळे मृतावस्थेत आढळले. नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांमार्फत हे मृतावस्थेतील पक्षी तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत. पुणेत क्रीनिंग झाल्यावर यात काही संशयास्पद वाटत असल्यास हे पक्षी भोपाळ येथे पाठवले जाणार आहेत.

  आठवडा बाजार येथील परिसरात 3 पक्षी मरून पडल्याचे दिसताच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय साळवी यांनी नगर परिषद आरोग्य समिती सभापती निमेश नायर यांना बुधवारी संपर्क साधून कल्पना दिली. हा प्रकार पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक पनवेलकर यांच्या कानावर घातला. त्यांनी हे तिन्ही पक्षी ताब्यात घेण्यास सांगितले. त्यानुसार न.प.च्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांना कळवून ते पक्षी खबरदारी घेत ताब्यात घेण्यास सांगण्यात आले. न. प. स्वच्छता निरीक्षक सावर, स्वच्छता मुकादम अविनाश कांबळे आणि सफाई कामगार यांनी त्या परिसरात आढळून आलेल्या एका मृत पक्षाला ताब्यात घेत गुरुवारी वैद्यकीय अधिकाऱयांकडे  तपासणीसाठी ताब्यात दिला.

 त्यानंतर गुरूवारी पंधरामाड परिसरातही 2 कावळे मृतावस्थेत स्थानिक नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती राकेश उर्फ बाबा नागवेकर यांना दिसले. त्यांनी आरोग्य समिती सभापती नायर यांच्याशी संपर्क साधून ही माहिती दिली. या बाबत डॉ. पनवेलकर यांच्याशी संपर्क साधल्यानंतर डॉ. पनवेलकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पंधरामाड येथे जाऊन मृत कावळे तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. या मृत पक्षांना आता तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे. पुणेत क्रीनिंग झाल्यावर यात काही संशयास्पद वाटत असल्यास हे पक्षी भोपाळ येथे पाठवले जाणार आहेत. संपूर्ण अहवाल येण्यासाठी अजून 8 दिवस लागण्याची शक्यता आहे. शहरात असे पक्षी मृतावस्थेत आढळून आल्याने शहरवासियांच्या मनात भीती निर्माण होऊ नये, यासाठी आरोग्य सभापतींनी डॉ. पनवेलकर यांना आवश्यक ते उपाय करण्याबाबतचे मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे. आरोग्य सभापती निमेश नायर यांनी या घटनेची गांभीर्याने दाखल घेत तत्काळ सबंधित यंत्रणा कार्यन्वित केली. मात्र बर्ड फ्ल्यूचा मानवाला कोणताही धोका नसल्याचे जि.प. चे डॉ. विवेक पनवेलकर यांनी सांगितले.  

चाटवमध्ये कावळा मृतावस्थेत सापडला

खेड तालुक्यातील चाटव येथे गुरूवारी दुपारी एक कावळा मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृत कावळा काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱयांना कळवले. त्यानुसार येथील कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचून मृतावस्थेतील कावळा ताब्यात घेतला. मात्र या कावळय़ाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. कावळा तपासणीसाठी चिपळूण येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून अहवाल प्राप्तीनंतरच नेमक्या कारणाचा उलगडा होईल, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांनी सांगितले. 

Related Stories

जिह्यात बळीराजाला पावसाची प्रतीक्षा

Patil_p

सावंतवाडीत 25 टक्के ‘घरपट्टी वाढी’चा प्रस्ताव

NIKHIL_N

सिंधुकन्येचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश

NIKHIL_N

जिह्यात रूग्ण संख्येत घट, मृत्यूची चिंता कायम

Patil_p

मालवण पर्यटकांनी फुलले…

NIKHIL_N

रत्नागिरी : दापोलीत बुधवारी पावसाचा जोर कायम

Archana Banage