Tarun Bharat

रत्नागिरीत एका दिवसात 4 रुग्ण वाढले, कोरोना बाधितांची संख्या 15 वर

Advertisements

रत्नागिरी/प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी दापोली येथे 2 आणि संगमेश्वर येथे 2 रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या गेल्या तीन दिवसात नवीन 9 रुग्णांची भर पडली आहे. आता रुग्णाची संख्या एकूण 15 झाली आहे.

आज नव्याने सापडलेले रुग्ण हे मुंबईतुन येणारे चाकरमान्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढू लागल्याने नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. चाकरमान्यांना जिल्हयात आणण्याचा निर्णय घेऊन प्रशासनाने चूक केल्याच्या प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.

यातील 2 रुग्ण संगमेश्वर तालुक्यातील मोर्डवे येथील सुन सासु तसेच 2 दापोलीतील पंचनदी ,ओणवशी, वाघवावडीतील आहेत. हे सर्व कोरोनाग्रस्त मुंबई रिटर्न क्वारंटाईन असलेले रुग्ण आहेत.

Related Stories

महापालिकेची 31 वॉर्डची प्रभाग रचना जाहीर

Abhijeet Khandekar

महाराष्ट्रात आजपासून कोरोना लसीकरण

Tousif Mujawar

नुकसान पुढील किमान दहा वर्षांचे

NIKHIL_N

कोट येथे 26 वर्षीय तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या

Patil_p

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील 730 डॉक्टरांचा मृत्यू

Tousif Mujawar

उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का, ‘हा’ नेता सहकुटुंब करणार सपामध्ये प्रवेश

Archana Banage
error: Content is protected !!