Tarun Bharat

रत्नागिरीत तारांगण आकार घेऊ लागले!

देशातील दुसरे तर महाराष्ट्रातील पहिले थ्रीडी तारांगण : येथील पर्यटनात ठरणार ‘रोल मॉडेल’

प्रतिनिधी / रत्नागिरी

पर्यटनाच्या दृष्टीने रत्नागिरी शहरात माळनाका येथे भारतातील पहिल्या व महाराष्ट्र राज्यातील पहिल्या थ्रीडी तारांगणाची मुहूर्तमेढ ऑक्टोबर 2018 मध्ये रोवण्यात आली होते. अशा या बहुचर्चित सुमारे 9 कोटींचा भव्य प्रकल्प मार्गी लावण्यासाठी वेगाने कार्यवाही सुरू आहे. हे तारांगण एक रोल मॉडेल ठरणार आहे.

  जिल्हय़ात होणाऱया तारांगणाच्या रुपाने येथील मुलांना आगळीवेगळी देण्यात आलेली भेट ही तमाम कोकणवासियांसाठी मोठी गोष्ट ठरणार आहे. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) अंतर्गंत रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र. 2 मधील माळनाका येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तारांगण उभे राहत आहे. भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले थ्रीडी तारांगण आहे. येथील सुमारे 1200 चौ.मी. क्षेत्रावर 568 लाख इतक्या खर्चातून ही भव्य वास्तू उभी राहणार आहे.

या तारांगणाचे भूमिपूजन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याहस्ते ऑक्टोबर 2018 मध्ये झाले होते. हे तारांगण उभे राहिल्यानंतर पर्यटनाच्या दृष्टीनेही रत्नागिरीला महत्व येणार आहे. ही भव्य वास्तू वेगाने मार्गी लावण्याचे नियोजन यापूर्वीच झाले आहे. त्यामुळे हा बहुचर्चित प्रकल्प तडीस नेण्यासाठी माळनाका येथील कामालाही गती देण्यात आली आहे. या तारांगणात माफक फि राहणार आहेच. पण नगर परिषद व जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत पाहण्याची सुविधा राहणार असल्याचे त्यावेळीच सांगण्यात आले आहे. मुंबईतील वरळीनंतर रत्नागिरीतील तारांगण हे कोकणातील पहिले तारांगण ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

अशी असणार तारांगणाची रचनाः

  • सुमारे 62 व्यक्तींसाठी आसन क्षमता.
  • विज्ञान व प्रशिक्षण प्रदर्शन हॉल.
  • अति महनीय व्यक्तींकरता कक्ष.
  • प्रोजेक्शन सिस्टीमसह सुसज्य सभागृह.
  • ओपन थिएटर, प्रत्यक्ष प्रक्षेपण सभागृह.
  • विज्ञान प्रदर्शन व मनोरंजन सभागृह आदी सुविधा.

Related Stories

गरीब शेतकऱयाचे वीजबिल तब्बल 32 हजार

Patil_p

माजी सभापती स्वप्नाली सावंत यांच्या घातपाताचा संशय

Patil_p

रत्नागिरी जिल्ह्यात ३२ वा बळी नव्याने ३५ पॉझिटिव्ह

Archana Banage

वीज मेळाव्यात ग्राहकांच्या शंकांचे निरसन महावितरण करणार

mithun mane

रत्नागिरीतील कोरोना स्थितीची केंद्राकडून गंभीर दखल

Patil_p

अनधिकृत मासेमारीची चौकशीची मागणी

Patil_p
error: Content is protected !!