Tarun Bharat

रत्नागिरीत पुन्हा येण्याचे दिदींचे स्वप्न राहिले अधुरे!

केतन पिलणकर / रत्नागिरी

गानसम्राज्ञी, भारतरत्न ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी निधन झाल्यानंतर कोकणातील संगीत क्षेत्रावर जणू अवकळाच पसरली. त्यांचे रत्नागिरीशी असलेले ञ+णानुबंध रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने उलगडले आहेत. त्यांनी लहानपणी म्हणजेच 8 व्या वर्षी वडिलांसोबत रत्नागिरीतील सावरकर कोठडी तसेच 1993-94 मध्ये श्री क्षेत्र गणपतीपुळेला भेट दिली. मात्र पुन्हा रत्नागिरीत येण्याचे दिदींचे स्वप्न हे अधुरेच राहिले आहे. त्यांच्यासमवेत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने कामकाजानिमित्त घालवलेले अविस्मरणीय अनुभव आजही त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. 

  रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी तसेच मुंबई विद्यापीठाच्या कामानिमित्त संस्थेचे कर्मचारी मोरेश्वर जोशी हे मुंबईला जाणार होत़े यावेळी संस्था पदाधिकारी शिल्पा पटवर्धन यांनी जोशी यांना लता मंगेशकर यांच्या कार्यालयात एक पत्र देण्यास सांगितले होत़े त्यानुसार जोशी हे लतादिदींच्या कार्यालयात 2008 साली पत्र देण्यासाठी गेले असता दिदींच्या स्वीय सहाय्यकाने घरात फोन करुन रत्नागिरी एज्युकेशन सोयायटीचे कर्मचारी पत्र घेऊन रत्नागिरीतून आल्याचे सांगितल़े थोडय़ाच वेळात स्वीय सहाय्यकाला फोन आला की, जोशी यांना दिदींना भेटायचे असून त्यांना पहिल्या मजल्यावर पाठवण्यात याव़े त्यानुसार जोशी पहिल्या मजल्यावर गेले असता दिदींनीच जोशी यांचे दार उघडून स्वागत केल़े संध्याकाळची 6.30 वेळ होत़ी दिदी देवाची पूजा करुन नुकत्याच बसल्या होत्य़ा खोलीभर अगरबत्तीचा सुवास दरवळत होत़ा यावेळी दिदींची सर्व भावंडे ह्दयनाथ, आशा, मीना, उषा मंगेशकर, ह्दयनाथ यांचा मुलगाही होत़ा

   आताच्या रत्नागिरीचे वर्णन करा बघू…….

जोशी यांना दिदी म्हणाल्या की, तुम्ही इतक्या लांबून आलात.. पत्र घेवून आलात खूप बरं वाटलं, अशी कृतज्ञता रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीविषयी व्यक्त केली व त्यानंतर दिदींनी आपल्या पहिल्या रत्नागिरीच्या भेटीची आठवण सांगितली.त्या म्हणाल्या की, मी आठ वर्षाची असताना वडिलांबरोबर सावरकरांची कोठडी बघायला रत्नागिरीत आले होत़े मात्र त्यानंतर रत्नागिरीत जाणे झाले नाही. त्यामुळे आताची रत्नागिरी कशी आहे, याचे वर्णन करुन सांगा, असे जोशींना म्हणाल्या. आपण साक्षात दिदींशी बोलतोय यावर जोशी यांचा विश्वासच बसत नव्हत़ा मात्र स्वतः सावरत जोशी यांनी रत्नागिरीची सर्व माहिती दिल़ी यावर शेवटी दिदी जोशींना म्हणाल्या की, तुम्ही मला रत्नागिरी फिरवून आणलात़ तुम्ही भेटायला येणे म्हणजे दैवी योग आह़े तुम्ही शब्दशः रत्नागिरी डोळय़ासमोर उभी केलात़ तुम्हांला भेटून मला आनंद झाल्याचे दिदींनी सांगितले.

भविष्यात रत्नागिरीत मला यायचे असून दोन गोष्टी बघायच्या आहेत़ एक म्हणजे रत्नागिरीत मला थिबा राजाचा राजवाडा पहायचा असून अशी वास्तू थिबा राज्याच्या देशामध्येही नसून रत्नागिरीकरांनी त्या देशातील स्थापत्यशिल्प अद्यापही जपून ठेवले आह़े  थिबा पॅलेसची व्यवस्था दिदींना बघायची होत़ी दुसरी गोष्ट सावरकरांच्या कोठडीत जाऊन 2 मिनिटे बसायचे होत़े

 चक्क पाऊण तास मारल्या गप्पा

 दिदी भेटायल्या येण्याबरोबर 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ कोणाचे ऐकत नसत़ 3 मिनिटांनंतर दिदी बोलून उठून जात असत़ बाकीचा विषय आम्ही पाहतो, अशी माहिती हृदयनाथ मंगेशकर यांनी दिल़ी मात्र जोशी यांच्याशी तब्बल पाऊण तास रत्नागिरीकरांविषयी दिदी बोलत होत्य़ा  

दिदींमुळे गोगटे महाविद्यालय ग्रंथालय इमारतीला देणगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या ग्रंथालयासाठी लता मंगेशकर या राज्यसभेच्या खासदार असताना 25 लाखाची देणगी दिल्याची आठवण रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांनी ‘तरुण भारत’कडे व्यक्त केल़ी लता दिदींनी 2005 साली गोगटे-जोगळेकर महाविद्यालय ग्रंथालयासाठी इमारत बांधकामासाठी आपल्या खासदार निधीतून सोसायटीला 25 लाखांची देणगी दिली होत़ी दिदींनी दिलेल्या देणगीच्या कृतज्ञतेमुळे दरवर्षी सोसायटीकडून दिदींच्या घरी हापूस आंबे व संस्थेचा कार्य अहवाल पाठवण्यात येत असल्याची आठवण शिल्पा पटवर्धन यांनी यावेळी सांगितल़ी सोसायटीला दिलेल्या देणगीमधून सुसज्ज अशी ग्रंथालयाची इमारत उभी राहिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाल्याची माहिती त्यांनी दिल़ी                        

Related Stories

सांत्वनासाठी गेलेल्या महिलेचा अपघातात मृत्यू

Patil_p

रत्नागिरी : ‘रजिम’ बँकेकडून मिळणार ३० लाखाचे विमा कवच

Archana Banage

सुरूवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू: आशिष शेलार

Archana Banage

भाषेचे संस्कार हे नेहमीच चिरंतर- रवींद्र मडगावकर

Anuja Kudatarkar

आरोग्य विभागाच्या भरतीत गोंधळ; काळ्य़ा यादीतील कंपन्यांकडे सूत्रे

Patil_p

सोमवारी जिल्हय़ात धावल्या एसटीच्या 140 फेऱया

Patil_p
error: Content is protected !!