Tarun Bharat

रत्नागिरीत कारागृहातील पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

Advertisements


प्रतिनिधी/रत्नागिरी

सातत्याने वाढणाऱ्या कोरोनाच्या विळख्यात आता पोलीस कर्मचारी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी देखील सापडले आहेत. जिल्हा रुग्णालयातील एका नर्ससह साखरतर येथील कंटेन्मेंट झोनमध्ये सेवा बजावणाऱ्या एका आशा कर्मचाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. तसेच जेलमधील एक पोलीस कर्मचारी देखील कोरोना बाधित सापडला आहे.

जिल्हा कारागृहातील 28 ते 29 वयाच्या एका कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जेल प्रशासन ची झोप उडाली आहे, हा कर्मचारी 4 दिवसापासून आजारी होता त्यामुळे सुट्टीवर होता मात्र आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कर्मचारी आणि बंदी चांगलेच हादरले आहेत.

मंगळवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार रत्नागिरीत पाच नवे रुग्ण सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सापडलेल्या पाच रुग्णांमध्ये एक पोलीस कर्मचारी, एक नर्स आणि एक आशा सेविका आहे. या सर्वाना कोव्हिड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच या पिझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

Related Stories

बिबटय़ाची दुचाकीवर झडप, चालक जखमी

Patil_p

जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिले बांधकाम विभागाला पत्र

Patil_p

रत्नागिरी जिल्ह्यात आज 37 नवे रुग्ण तर तिघांचा मृत्यू तर

Abhijeet Shinde

राष्ट्रवादीतर्फे पोष्टऑफीस मधील कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक औषधांचे वाटप

Ganeshprasad Gogate

तीन महिन्यांनी रुग्णसंख्या तिनशेच्या खाली

NIKHIL_N

‘आरोग्य सेतू’ ऍप डाऊनलोड करा!

NIKHIL_N
error: Content is protected !!