Tarun Bharat

रत्नागिरीत येथे होणार तात्पुरते कारागृह

Advertisements

प्रतिनिधी / रत्नागिरी

नव्याने येणाऱ्या कैद्यांना विलगिकरण आवश्यक असल्याने 40 बंदी क्षमतेचे तात्पुरते कारागृह करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य बिल्डिंगमधील दोन कक्षात याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये 20 महिला व 20 पुरुष कैदी ठेवण्याची क्षमता आहे. तसेच तिथे गार्ड रूमची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आता नव्याने येणाऱ्या नवीन बंदीवानांना या तात्पुरत्या कारागृहात ठेवले जाणार असून पोलीस दलाकडून सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे तसे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काढले आहे.

Related Stories

राजगृह नासधूसप्रकरणी दोषींवर कारवाई करा!

NIKHIL_N

आता घरबसल्या मिळतोय ‘सातबारा’

NIKHIL_N

नेमळे कौल उत्पादक संस्थेला आधुनिकतेने उर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न- राऊळ

Anuja Kudatarkar

आर्ट बिट्स फाऊंडेशन च्या गुरु गौरव पुरस्कार 2021 साठी राजेश विनायक आजगावकर यांची निवड

NIKHIL_N

दापोलीत मच्छीची आवक घटल्याने दर गगनाला

Omkar B

चिपळुणात पुन्हा अतिक्रमणावर कारवाई!

Amit Kulkarni
error: Content is protected !!