Tarun Bharat

रत्नागिरीत होणार समुद्रशास्त्र विद्यापीठ!

Advertisements

प्रतिनिधी/ रत्नागिरी

समुद्र जीवशास्त्र, समुद्र भूशास्त्र, मत्स्यशास्त्र, तंत्रज्ञान, पर्यटन, पर्यावरणशास्त्र व संवर्धन अशा सर्व गोष्टींचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी महाराष्ट्र समुद्रशास्त्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी ड़ॉ सारंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती पुढील 3 महिन्यामध्ये शासनास अहवाल सादर करणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने म्हटले आहे.

  प्रस्तावित समुद्रशास्त्र विद्यापीठाच्या स्वरुपाबाबत शासनाला शिफारस करण्यासाठी 4 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आह़े  या समितीचे अध्यक्ष तारकर्ली- सिंधुदुर्ग येथील एमटीडीसीचे इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ स्कूबा डायव्हिंग ऍण्ड ऍक्वाटिक स्पोर्टसचे मुख्य व्यवस्थापक ड़ॉ  सारंग कुलकर्णी आहेत़ सदस्य म्हणून नॅशनल इन्स्टिटय़ुट ऑफ ओशियोनोग्राफ्री गोव्याचे ड़ॉ नरसिंह ठाकूर, पुणे फॉर्मसी कॉलेजचे ड़ॉ  बी. बी. चौगुले तर सदस्य सचिव म्हणून उच्च व शिक्षण पुणेचे संचालक काम पाहणार आहेत़ ही समिती पुढील 3 महिन्यामध्ये शासनाला अहवाल सादर करणार आह़े

  या विद्यापीठाच्या उभारणीसाठी येणारा खर्च, आवश्यक जमिन, विद्यापीठाची आवश्यकता, समुद्रशास्त्र विद्यापीठातील शिक्षकांची पात्रता, विद्यार्थ्यांची क्षमता, रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाची निवड या बाबतच्या शिफारसी ही समिती करेल, असे उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आदेशात म्हटले आह़े

Related Stories

भाजपने खासदार राऊतांच्या विरोधात आंदोलन

Patil_p

भारतीय डाक विभागाची 30 रोजी पेन्शन अदालत

NIKHIL_N

पर्ससीन मासेमारीला आजपासून प्रारंभ

Patil_p

शिवसेनेच्या माजगांव युवासेना विभागप्रमुखपदी अतुल कासार

Ganeshprasad Gogate

अज्ञाताने रिक्षासह तीन दुचाकी जाळल्या

Patil_p

चिपळुणात पावसाला दमदार सुरूवात!

Patil_p
error: Content is protected !!