Tarun Bharat

रत्नागिरी : कोविड सेंटरसाठी खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांनी वापरला विशेषाधिकार

शिवसेनेने केला होता विरोध, मतदानादरम्यान एका सेना नगरसेवकाने ठरावाच्या बाजुने केले मतदान

प्रतिनिधी/खेड

खेड नगरपरिषदेच्या एकविरा नगर येथील दवाखान्यात कोविड सेंटर चालवण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला ऑनलाईन सर्वसाधारण सभेत शिवसेना नगरसेवकांनी विरोध दर्शविला. मतदानादरम्या शिवसेनेच्या एका नगरसेवकाने ठरावाच्या बाजुने मतदान केल्याने झालेल्या समसमान मतांमुळे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी विशेषाधिकार वापरत हा ठराव मंजूर करून घेतला. यामुळे कोविड सेंटरमध्ये २० ते २५ रूग्णांवर उपचार होण्यास मदत होणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर शहरातही कोरोनाने थैमान घातले. गेल्या तीन महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून अनेक रूग्णांचा कोरोनाने मृत्यूही झाला आहे. यापार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून नगरपरिषदेच्या मालकीच्या दवाखान्याचा वापर कमी प्रमाणातच होत होता. कोरोनाच्या संकटामुळे याठिकाणी कोविड सेंटर उभारण्याचा महत्वाकांक्षी निर्णय नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी घेतला.

मात्र, या निर्णयाला शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविल्यानंतर मतदान घेण्यात आले. मतदानादरम्यान , शहर विकास आघाडी व शिवसेना यांची मते समसमान झाली. शिवसेनेच्या एका सदस्याने शहर विकास आघाडीच्या बाजुने मतदान केले. याचवेळी नगराध्यक्ष नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी नगराध्यक्षांना असलेला विशेषाधिकार वापरून कोगिड सेंटरचा ठराव मंजूर करून घेतला. नगरपरिषद दवाखान्यात सुरू होणाऱ्या कोविड सेंटर अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून पूर्ण क्षमतेने रूग्णांवर उपचार देखील होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार व बंधन बँक यांच्या माध्यमातून नगरपरिषदेस कार्डियाक रूग्णावाहिका उपलब्ध झाली असून ही सेवा पुरवण्यासाठी एखाद्या खासगी संस्थेला जबाबदारी देण्याचा ठरावही सभेत मंजूर करण्यात आला. खासदार सुनील तटकरे युवा मंचकडून नगरपरिषदेस प्राप्त झालेल्या रूग्णवाहिकेचा दर ठरवाणे व शुल्क निश्चित करणे, रुग्णवाहिका कार्यक्षेत्र, राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह व फोटोबाबत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला.

शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला. नगररचना योजना अंमलबजावणी करणे, याकामी येणाऱ्या खर्चास मान्यता दाण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. या विषयासह अन्य महत्वपूर्ण विषयावरही चर्चा करण्यात आली.

Related Stories

किरीट सोमय्या आज दापोलीत

Kalyani Amanagi

मळगाव घाटरस्ता अखेर सर्व वाहतुकीसाठी खुला

Anuja Kudatarkar

ह्रदयातील आंबोली….एकदा नक्की भेट द्या !

Anuja Kudatarkar

जिह्याच्या जलधी क्षेत्रामध्ये परप्रांतीय नौका पकडली

Amit Kulkarni

रानवी पवार साखरी मार्गावर दोन ‘एसटी’ ची समोरासमोर धडक; शाळकरी मुलांसह प्रवासी जखमी

Archana Banage

जिह्यात आणखी 29 मृत्यू

Patil_p