Tarun Bharat

रत्नागिरी : खेडमध्ये आणखी आठ पॉझिटिव्ह

आंबवलीतील २ विद्यार्थ्यांसह वरवलीतील ६ जणांचा समावेश, आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरूच

प्रतिनिधी / खेड

तालुक्यातील वरवली, आंबवलीत कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच शुक्रवारी रात्री  आणखी आठ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. आंबवलीतील दोन  विद्यार्थ्यांसह वरवलीतील सहा जणांचा यामध्ये समावेश आहे. नव्या रुग्णांमुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ५५० झाली आहे. झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेची धावपळही वाढली आहे.

तालुक्यातील वरवली-धुपेवाडी कोरोनाचे हॉटस्पॉट बनत असतानाच लगतच्या आंबवली गावातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आंबवली न्यू इंग्लिश स्कूलमधील एका विद्यार्थ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर विद्यालय २० तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनेने घेतला होता. दरम्यान विद्यालयातील ४५ विद्यार्थ्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. यातील दोन विद्यार्थ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शाळा आणखी काही दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. वरवली गावात कन्टेनमेंट झोन जाहीर झाल्यापासून कोरोनाचे रुग्ण वाढतच असल्याने या ठिकाणी तैनात आरोग्य पथकांचा मुक्कामही वाढत आहे. आरोग्य पथकांकडून सर्वेक्षणाची मोहीम अजूनही सुरूच आहे. वरवली-धुपेवाडीतील कोरोनाबाधितांची संख्या ४७ वर पोहोचल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत. 

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी २३ नवे रुग्ण , चिपळुणातील वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी जिह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या कायम राहिली आहे. जिह्यात सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा २३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. चिपळूण तालुक्यातील ६७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या ३६० झाली आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्राप्त माहितीनुसार, मागील २४ तासात  जिह्यात एकूण २३ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत रत्नागिरी तालुक्यातील ४, चिपळूण ३, खेड ११ व राजापूर तालुक्यातील १ रुग्णांचा समावेश आहे. ऍन्टीजेन चाचणीत रत्नागिरीत १ तर दापोलीत ३ कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे जिह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार ८२९ झाली आहे.  तीन रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून घरी सोडण्यात आले.  यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९ हजार २९४ झाली असून बरे होण्याचे प्रमाण ९४.६९ टक्के तर मृत्यूदर ३.६६ झाला आह़े

एकूण रुग्ण-९८२९
नवे रुग्ण – २३
नवे मृत्यू – ०१
एकूण मृत्यू – ३६०

Related Stories

चिपळूण महापूरप्रश्नी केंद्र, राज्याने उत्तर देण्याचे निर्देश

Patil_p

जिल्हय़ात 1500 मे.टन खत दाखल

Patil_p

NMMS परीक्षेत उभादांडा हायस्कुलची प्रतिक्षा प्रदिप नाईक जिल्ह्यात प्रथम

Anuja Kudatarkar

साखरतरच्या दोन्ही कोरोनाग्रस्तांचे अहवाल निगेटीव्ह

Patil_p

‘गणपती स्पेशल’ महिनाभरानंतर यार्डात विसावल्या!

Patil_p

कोरोना समाप्तीनंतरच शाळा सुरू करा!

NIKHIL_N