Tarun Bharat

रत्नागिरी : गुहागरात कोरोना रूग्णसंख्या घटल्याने दिलासा

संरक्षणाचे गांभीर्य वाढले, 585जणांनी केली कोरोनावर यशस्वी मात, 11जणांचा मृत्यू, 53 रूग्ण उपचाराखाली, रूग्णसंख्या घटल्याने गुहागरला दिलासा

प्रतिनिधी/गुहागर

तालुक्यात सप्टेंबरमध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढत असताना यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये काही महत्वाच्या व्यक्तींचा समावेश असल्याने कोरोनाचे गांभीर्य वाढून त्यापासून आपले संरक्षण करण्याचीही मानसिकता तालुक्यातील जनतेमध्ये वाढली आहे. परिणामी तालुक्यातील रूग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत तालुक्यातील 585 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर केवळ 53 रूग्ण उपचाराखाली आहेत. यातील 9 रूग्ण कोविड केअर सेंटरमध्ये, तर 44 रूग्ण घरामध्येच आयसोलेट आहेत.

तालुक्यातील कोरोना संक्रमण नियंत्रणाखाली येत असल्याचे सध्यातरी चित्र आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतून तालुका लवकरच कोरोना मुक्तीकडे वाटचाल करेल असा विश्वास आरोग्य विभागाला वाटत आहे. आतापर्यंत तालुक्यात 649 पॉझिटीव्ह रूग्ण झाली आहे. यामध्ये 11 जणांचा मृत्यू, तर 585 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. गणेशोत्सवानंतर रूग्णसंख्या झपाट्याने वाढी होती. यामध्ये गेल्या महिन्याभरात 6 जणांचा मृत्यू झाला. यामुळे जनताच अधिक जागृत झाली. महसूल, पंचायत समिती व आरोग्य विभागाने वेळणेश्वरबरोबर शृंगारतळी येथे कोरोना तपासणी केंद्र सुरू केल्याने जनता स्वत:हून आपली तपासणी करण्यासाठी पुढे येऊ लागले. यामुळे संक्रमित रूग्ण समजू लागल्याने व त्यावर त्वरित उपचार सुरू झाल्याने रूग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. केली जाणारी तपासणी व मिळून येणारे रूग्ण पमाण 1 ते 2 टक्क्यावर आले आहे. यामुळे तालुक्यात कोरोनाला नियंत्रित आणण्यामध्ये आपण यशस्वी होत असल्याचे आरोग्य विभागाला विश्वास वाटत आहे.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेला जनतेचा उत्स्फूर्त पतिसाद

आरोग्य विभागाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेला सुरूवातीला अनेक अडचणी आल्या, परंतु दुसऱया टप्प्याच्या मोहिमेमध्ये जनतेकडूनच अधिक सहकार्य मिळू लागले आहे. 15 सप्टेंबर ते 10 आŸक्टोबर या कालावधीत घेण्यात आलेल्या या मोहिममध्ये तालुक्यातील 31517 घरांमधील 1 लाख 9 हजार 572 जणांची तपासणी करण्यात आली. यामधून 99 संभाव्य संकमण झालेल्या रूग्णांमधून 10 रूग्ण सारी या आजाराने व 89 रूग्ण हे सर्दी-खोकल्याने त्रस्त होते. या सर्वांच्या करण्यात आलेल्या आरटीपीसीआर व अŸन्टीजेन तपासणीमधून केवळ 12 रूग्ण कोरोना पाŸझिटीव्ह रूग्ण सापडले.
15 ऑक्टोबरपासून या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आतापर्यंत 60 टक्के जनतेची तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये सर्दी-खोकल्याच्या सापडलेल्या 15 संशयीत रूग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली. यामधूनही केवळ 2 कोरोना पाŸझिटीव्ह रूग्ण सापडले आहेत. या दुसऱया टप्प्याच्या मोहिमेला जनतेकडून चांगले सहकार्य मिळत असून जनतेमध्येही अधिक जागृतता निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे.

60 गावांमध्ये कोरोना नाही!

तालुक्यात आतापर्यंत सापडलेल्या रूग्णांमध्ये तालुक्यातील 122 महसुली गावांपैकी 62 गावांमध्ये कोरोनाचे रूग्ण सापडले, परंतु 60 गावांमध्ये एकही रूग्ण सापडलेला नाही. यामुळे 50 गावे आजही कोरोनापासून सुरक्षित असल्याचे पहावयास मिळत आहे.

Related Stories

डोंगरपालचे सुपुत्र मेजर जनरल कुलभूषण गवस यांना लेफ्टनंट जनरल

Anuja Kudatarkar

चिपळूण नगराध्यक्षांना ‘नगर विकास’ची कारणे दाखवा नोटीस

Patil_p

कोरोनाबाधीत महिलांचा आंब्याच्या टेम्पोतून प्रवास

Patil_p

नियमांचे पालन न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करा!

NIKHIL_N

रत्नागिरी : मुरडव येथील अपघातात दुचाकीस्वार ठार

Archana Banage

रोटरी क्लब वेंगुर्ला मिडटाऊनचा २०२१-२२ चा पदग्रहण सोहळा संपन्न

Anuja Kudatarkar