Tarun Bharat

रत्नागिरी : गुहागर समुद्र किनाऱ्यावरील सॉलिड जेटी वरही हातोडा

Advertisements

प्रतिनिधी / रत्नागिरी

गुहागर समुद्रकिनारी पतन अभियंता रत्नागिरी विभाग पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत बारावा वित्त आयोग सागरी किनारी व सृष्टी पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत तात्कालीन नगर विकास राज्यमंत्री व विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या सुमारे 96 लाख खर्च झालेली सॉलिड जेटी वर आज अखेर हातोडा पडला आहे. सीआरझेडची परवानगी न घेता उभारण्यात आलेली ही जेटी काढून टाकावी असा निकाल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पुणे यांनी दिला होता. पतन उपविभाग दापोली यांच्यावतीने सोमवारपासून ही जेटी काढून टाकण्याचे काम सुरू झाले आहे.

रत्नागिरी : गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील सॉलिड जीटी वरही हातोडा

रत्नागिरी : गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील सॉलिड जीटी वरही हातोडा [ व्हीडीओ : सत्यवान घाडे ]

Posted by Tarun Bharat Daily on Monday, August 31, 2020

गुहागर चा पर्यटन विकास व्हावा याकरिता आमदार जाधव यांनी मंत्री असताना गुहागर समुद्रकिनाऱ्यावर इको टुरिझम च्या माध्यमातून समुद्राचे जवळून दर्शन व्हावे व पर्यटनाचे आकर्षण ठरावे याकरिता ही सॉलिड जेटी उभारली होती. सदर जेटीचे काम नोव्हेंबर 2013 मध्ये सुरू करून 2014 मध्ये याचा शुभारंभ झाला होता. 12 जून 2014 मध्ये समुद्रातील उधाणाच्या पहिल्याच लाटेमध्ये या जेटी ला तडे गेले होते. झी टीव्हीवरील असलेले रेलिंग सोलर दिवे बसावयास असलेली बाकी हीसुद्धा उडाली होती. यामुळे या जेटीच्या कामाबाबत अनेकांनी तक्रारी केल्या होत्या जीटीचे काम सुरू असताना सदर जेटी अनधिकृतपणे उभारली जात असल्याची तक्रार माजी आमदार डॉ. विनय नातू यांनीही केली होती.

त्यानंतर गेल्या वर्षभरात गुहागर शहरातील बळवंत परचुरे यांनी सदर जीटी ही सीआरझेडची परवानगी न घेता उभारण्यात आली असून समुद्री जीवाना धोकादायक असल्याचे म्हणत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पुणे यांच्याकडे दावा दाखल केला होता. त्या सुरू असलेल्या दाव्यांमध्ये हरित लवादाने सदर जेटी काढून टाकण्यात यावी असा निकाल दिला होता या अगोदर ऑगस्टमध्येच सीआरझेडची परवानगी न घेता उभारण्यात आलेली सी व्हयू गॅलरी सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर यांनी काढून टाकले आहे. तर आत्ता समुद्रावरील जेटी ही काढून टाकण्याचे काम सुरू झाले आहे यामुळे पर्यटनासाठी उभारण्यात आलेले सर्व उपक्रम नष्ट झाले आहेत.

Related Stories

कोरोना काळातील बाप्पांचा उत्सव

Patil_p

लसनिर्मितीसाठी भारत-अमेरिका एकत्र

Patil_p

संख्या घटली; खंत ना कुणा पडली!

Omkar B

विघ्नहर्त्या, कोरोनाचे संकट लवकर दूर कर – मंत्री हसन मुश्रीफ

Archana Banage

निवडणूक काळात हजार कोटींचा मुद्देमाल जप्त

Patil_p

रत्नागिरीत कोरोनाचा 25 वा बळी, चिपळूणमधील महिलेचा मृत्यू

Archana Banage
error: Content is protected !!