Tarun Bharat

रत्नागिरी : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून, पतीस अटक

Advertisements

प्रतिनिधी / खेड

खेड तालुक्यातील भेलसई-कुपवाडी येथे पत्नीचा निघृण खून केल्याप्रकरणी पती सुरेश सुभाष चव्हाण ( ४३ ) यास शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास येथील पोलिसांनी अटक केली. दारूच्या नशेत व पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून खून केल्याचे तपासातून उघड झाले आहे. या घटनेने दोन मुले आईविना पोरकी झाली आहेत.

सुजिता सुरेश चव्हाण या ४० वर्षीय विवाहितेचा मृतदेह भेलसई कुपवाडी नदीकिनारी काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. याबाबत पोलीस पाटील यांनी येथील पोलीस स्थानकात खबर दिल्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहचले. महिलेच्या मृतदेहाची पाहणी केल्यानंतर तिच्या डोक्यात धारदार शस्त्र किंवा दगडाने ठेचून खून केल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली.

Related Stories

कोरोना मुक्त होताच पुन्हा रुग्णसेवेत

NIKHIL_N

भय इथले संपत नाही….

Amit Kulkarni

इ पीक पाहणी व नोंदणी अभियानाची आंबोली मंडळात प्रभावी अंमलबजावणी

NIKHIL_N

मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र मळगावात

NIKHIL_N

खेडमध्ये नगरप्रशासन खोकेधारकांमध्ये शाब्दिक चकमक

Abhijeet Shinde

रत्नागिरी : खेड पंचायत समितीत ग्रामसेवकांना सतत बोलवू नका

Abhijeet Shinde
error: Content is protected !!