Advertisements
67 हजार 430 रुपयाचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / रत्नागिरी
चिपळूण शहरातील गोवळकोट धक्क्यावरील मुख्य पुलाच्या खाली बुधवारी रात्रीच्या सुमारास बेकायदा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी धाड टाकून नैम मोहम्मद सुर्वे, मन्सूर उन्सान पटेल, हरी मानसिंग चव्हाण, अस्लम हसन मालानी, जलिल खतिब, गौस सुर्वे (सर्व गोवळकोट) यांना अटक करत त्यांच्याकडून 67 हजार 430 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.