Tarun Bharat

रत्नागिरी (चिपळूण) : अग्नी तांडवात वाहने भस्मसात

Advertisements

मार्गताम्हाने / वार्ताहर

चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथे आज, मंगळवारी, मध्यरात्री तीनच्या सुमारास झालेल्या अग्नी तांडवात दुचाकीसह चारचाकी वाहन जळून खाक झाले. येथील अजित साळवी यांची ही वाहने घराखालील पत्र्याच्या शेडमध्ये पार्कींग करुन ठेवण्यात आलेली होती. सुमारे 10 लाखांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालेले आहे.

जवळच असलेल्या रुग्णालयाच्या कंपाऊंडरने ही आग पाहिल्याने ती लगेच आटोक्यात आणण्यात आली. अन्यथा, साळवी यांचे निवासस्थान शेडमध्ये असलेली अर्बन बँकेची इमारत, किराणा मालाचे दुकानही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले असते. मात्र यांना झळ पोहचलेली नसली या आगीत मोठे नुकसान झाले आहे. ही आग नक्की लागली कशी किंवा कुणी लावली याचा तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

Related Stories

शिक्षक संचमान्यता निकषात होणार बदल

NIKHIL_N

चिवला समुद्र किनारी रापण नौका दुर्घटनाग्रस्त

NIKHIL_N

शिवसेना प्रवत्तेपदी उदय सामंतांची निवड

Patil_p

सिंधुदुर्गात एसटीचे 137 कर्मचारी कामावर

NIKHIL_N

आप्पा गवस यांनी उपसरपंच पदाचा दिला राजीनामा

NIKHIL_N

पती कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याचे समजताच पत्नीचे निधन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!