चिपळुणातील पकार, कोरोना अन् सभा घेण्याबाबत दाखवलेल्या उदासीनतेचा बसला फटका, पैसे राहणार तिजोरीत पडून, दरवर्षी होते मार्चअखेरीपर्यंत लाखोंचे वाटप
प्रतिनिधी/चिपळूण
येथील नगर परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी शहरातील सामाजिक संस्था, कीडा मंडळे यांना त्यांच्या कार्याला मदत म्हणून लाखो रूपयांच्या अनुदानाचे वाटप होते. मात्र यावर्षी कोरोना व वेळेत सभा घेण्याबाबत सर्वांनच दाखवलेली उदासीनता संस्थांचे नुकसान करणारी ठरली आहे. दरवर्षी मार्चअखेरीपर्यंत या अनुदानाचे वाटप होते. यावर्षी ही लाखो रूपयांची रक्कम तिजोरीत पडून राहणार आहे.
शहरात गेल्या अनेक वर्षापासून उक्ताड श्री गणेश मंडळ, युगांतर मित्र मंडळ, दिशांतर, कोकण सिरत कमिटी, खेंडचौकी श्री गणेश मित्र मंडळ, रोहिदास समाज सेवा संघ, ज्येष्ठ नागरिक संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, कांगणेवाडी नवयुवक मंडळ, चिपळूण जिमखाना, सहेली ग्रुप, चिपळूण महिला मंडळ, तालुका स्पोर्टस् अॅकडमी, पेठमाप श्री गणेश कीडा मंडळ, संघर्ष कीडा मंडळ, चिपळूण वैद्य मंडळ, भारतीय समाज सेवा केंद्र, पेठमाप सिध्दीविनायक ग्रुप, श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री देव हनुमान पासादिक मंडळ, श्री विठ्ठल-रूक्मिणी परीट जिनगर समाज, सह्याद्री निसर्ग मित्र, लोटिस्मा, गोवळकोट राजे सामाजिक पतिष्ठान, दृष्टी ग्रुप, सिद्धीविनायक ग्रुप, फुलवा कला साहित्य, पाग उघडा मारूती ग्रामस्थ मंडळ, युनिटी कीडा मंडळ, पाग व्यायामशाळा, गोवळकोट जयहिंद कीडा मंडळ, पेरणा पतिष्ठान, पेठमाप श्री कालिकामाता महिला मंडळ, बावशेवाडी महाबोधी बुद्धविहार ट्रस्ट, विघ्नहर्ता गुप, संत गाडगेबाबा परीट समाज संस्था आदी संस्था येथे सामाजिक काम करीत आहेत


previous post