प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काराना रूग्णांचे प्रमाण झपाट्याने कमी होत असून शनिवारी तुलनेनेने अल्प म्हणजे 7 नवे रूग्ण आढळून आले. 31 कारोनाबाधीत रूग्ण बरे होवून घरी परतल़े सलग तिसऱ्या दिवशी जिल्हयात एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाह़ी. यामुळे जिल्हा कारानामुक्तीकडे वेगाने वाटचाल करत असल्याचे चित्र निर्माण झाले आह़े.
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी झालेल्या 42 चाचण्यामध्ये 7 कोरोना बाधित आढळून आल़े यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत 2 तर ऍन्टीजेन चाचणीत 5 रूग्ण आढळले असून यामध्ये चिपळूण येथील 2, संगमेश्वर 1 तर रत्नागिरीत 04 रूग्ण आढळून आले आहेत़ यामुळे जिह्यातील एकूण कारानाबाधितांची एकूण संख्या 8 हजार 449 झाली आह़े.
शनिवारी कोरोनापासून बरे झालेल्या 31 रूग्णांना घरी सोडण्यात आल़े बरे झालेल्या रूग्णांची संख्या 7 हजार 870 झाली आह़े. बरे होण्याचे पमाण 93.26 पर्यंत पोहचले आह़े. मागील 3 दिवसांत एकाही रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याचे जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून सांगण्यात आले आह़े. कारोना रूग्णाचे पमाण वेगाने कमी होत असले तरीही धोका अजून टळलेला नसल्याने नागरिकांनी सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आह़े.
एकूण रूग्ण – 8449
नवे रूग्ण – 07
नवे मृत्यू – 00
एकूण मृत्यू – 316
- नव्याने 7 रूणांची वाढ
-31 रूग्णांना डिस्चार्ज - सलग तिसऱया दिवशी मृत्यू नाही
रत्नागिरी : तत