प्रतिनिधी / रत्नागिरी
गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी तिघांचा मृत्यू झाला. यात रत्नागितीतील 2 तर राजपुरातील एकाच समावेश असून जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 52 झाली आहे. शनिवार सायंकाळ पासून 37 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1557 झाली आहे.
34 जण कोरोनामुक्त
रविवारी 34 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 987 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा रुग्णालय 8, वेळणेश्वर 7, समाजकल्याण 11, घरडा खेड येथील 8 रुग्ण आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे
रत्नागिरी – 04
दापोली- 11
कामथे- 20
गुहागर- 02
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 1557
बरे झालेले – 987
मृत्यू – 52
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 518
13 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 16 हजार 82 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 15 हजार 558 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1557 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 13 हजार 990 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 524 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 524 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.


previous post