Tarun Bharat

रत्नागिरी जिल्हय़ात आणखीन तीन रिपोर्ट पॉझिटीव्ह

सिव्हीलच्या आणखीन एका ट्रेनी नर्सचा समावेश

प्रतिनिधी/ रत्नागिरी

मिरज येथून आता गुरूवारी रात्री 74 अहवाल प्राप्त झाले असून या अहवालापैकी 3 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर 71 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यामध्ये रत्नागिरी नर्सीग कॉलेजमधील आणखीन विद्यार्थिनीचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आढळले आहे. तर संगमेश्वरमधील देवळे 1, भडकंबा 1 असे दोन रूग्ण आढळले आहेत.

 रत्नागिरी जिल्हय़ात प्रवास हिस्ट्री असणाऱया बहुतांश चाकरमान्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत असून आतापर्यंत जिल्हय़ात एकूण 77 रूग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. यातील 8 रूग्ण पूर्णपणे झाले असून आता 69 रूग्ण उपचारात आहेत. रेड झोन मुंबईतून हजारों चाकरमानी हे रत्नागिरीत गावोगावी दाखल झाले आहेत, त्यांना आल्यानंतर कोरेंटाईन केले जात आहेत कोरोंटाईन केल्यामुळे संसर्गाचा धोका कमी आहे मात्र येथील सिव्हील हॉस्पीटल नर्सिग हॉस्टेल मध्ये राहणारी ट्रेनि नर्सला राजीवडय़ात तपासणी जावून आल्यानंतर काही कालावधीत ताप आल्याने ती स्वत:हून रूग्णालयात उपचारासाठी पुढे आली त्यानंतर तिच्या सोबत असणाऱया 19 ट्रेनि नर्सना कोरोंटाईन करण्यात आले होते यापैकी आता आणखीन तिघींचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा चांगलीच अलर्ट झाली आहे.

शुक्रवारी आणखीन पाच रूग्ण बरे होवून घरी परतल्याने जिल्हय़ासाठी अतिशय चांगला दिलासा आहे. या पाचही जणांमध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणे नव्हती मात्र रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते नव्या नियमानुसार ज्यांच्यात लक्षणे नाही मात्र ते स्टेबल असतील तर त्यांना सात दिवशाच्या उपचारानंतर डिस्चार्ज देण्याचे आदेश आहेत त्यानुसार या पाच जणांना नियमावलीचे पालन करण्याच्या अटीवर डिस्जार्च देण्यात आला आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत एकूण 13 रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत.

Related Stories

अभिनंदनात उपहासात्मकता कशाला?

NIKHIL_N

रत्नागिरी जिल्ह्यात १४१ पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू

Archana Banage

आता पालकमंत्र्यांनी त्यांचा शब्द पाळावा- संजू परब

Anuja Kudatarkar

दोडामार्ग तहसीलदारपदी अरुण खानोलकर रुजू

NIKHIL_N

शिवसेना नवरात्रौत्सव अध्यक्षपदी राजू शेटये सचिवपदी राजू राणे

NIKHIL_N

खासदारांनी स्वत: होम क्वारंटाईन होण्याची गरज!

NIKHIL_N