Tarun Bharat

रत्नागिरी : दापोलीत कोविड सेंटरची क्षमता वाढणार

वार्ताहर / मौजेदापोली

दापोली कोविड सेंटरमध्ये १३० रूग्ण ठेवण्याची क्षमता आहे. ती आणखी ५० ने वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी दापोली नगरपंचायतीच्या नवीन इमारतीची पाहणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता अधिक रूग्ण आल्यास दापोलीतील रूग्णांना कळंबणी, रत्नागिरी अथवा इतर खाजगी रूग्णालयांमध्ये जाण्याची गरज भासणार नसल्याचे बोलले जात आहे.

दापोली, मंडणगड, खेडचे आमदार योगेश कदम, प्रातांधिकारी शरद पवार, तहसिलदार कविता पाटील, नगराध्यक्षा परवीन शेख जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. फुले, दापोली उपजिल्हा रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. महेश भागवत आदी अधिकार्‍यांनी दापोलीतील कोविड सेंटर व दानपंच्या नवीन इमारतीची पाहणी व वैद्यकिय अधिकार्‍यांशी चर्चा केली.

कोविड सेंटरमध्ये अधिकचे ५० रूग्ण रहाण्यासाठी कोविड सेंटरमध्ये वाढ होणार असल्याने दापोलीकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Related Stories

जिल्हय़ात आणखी चौघांचा मृत्यू

Patil_p

रोजगार दो! भाई, रोजगार दो!

NIKHIL_N

सिंधुदुर्ग जिल्हय़ात पाऊस दमदार

NIKHIL_N

ठाकरे सरकारने शेतकऱयांच्या तोंडाला पुसली पाने

Patil_p

जिल्हय़ात 235 एसटी कर्मचाऱयांची सेवा समाप्त

Patil_p

मणेरी येथील नदीत गोव्यातील प्रौढाचा मृतदेह

NIKHIL_N
error: Content is protected !!