Tarun Bharat

रत्नागिरी : दापोलीत ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू, नवे ६ रूग्ण

प्रतिनिधी / रत्नागिरी

जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसून येत होते. परिणामी कोरोनामुळे होणारे मृत्यूच्या घटना देखील समोर येत आहेत. मंगळवारी दापोली तालुक्यातील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी जिल्ह्यामध्ये कोरोनाचे केवळ ६ रूग्ण आढळून आले आहेत. तर १८ रूग्ण हे कोरोनामुक्त होवून घरी परतले.

मंगळवारी जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून करण्यात आलेल्या कोरोनाचे २१५ चाचण्यांपैकी आरटीपीसीआर टेस्टमध्ये शून्य तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये ६ कारोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यातील रत्नागिरी तालुक्यात ४, चिपळूण १ व दापोली तालुक्यात एक रूग्ण मिळून आला आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ८ हजार ८१५ इतकी झाली आहे तर मंगळवारी कोरोनापासून बरे झालेल्या १८ रूग्णांना घरी सोडण्यात आले. यामुळे कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या ८ हजार २९८ वर पोहचले आहे. जिल्ह्यातील बरे होण्याचे पमाण ९४.१३ इतके आहे.

मृतांच्या तालुकानियाह आकडेवारीचा विचार करता रत्नागिरी सर्वाधिक ८८, खेड ५१, गुहागर १२, दापोली ३३, चिपळूण ७६, संगमेश्वर ३३, लांजा ११, राजापूर १४ तर मंडणगडमध्ये ३ असे एकूण ३२१ जणांचा आतापर्यंत कारोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना संबंधित कोणतीही लक्षणे असल्यास वेळेत तपासणी करून घ्यावी असे अवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

एकूण रूग्ण – ८८१५
नवे रूग्ण -०६
नवे मृत्यू -०१
एकूण मृत्यू -३२१

Related Stories

ई-पीक पाहणी नोंदणीत रत्नागिरी कोकण विभागात प्रथम

Patil_p

निसर्ग चक्रीवादळाचा तडाख्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान

Archana Banage

वेंगुर्ले शहर सौदर्यीकरण स्पर्धेसाठी राबविणार विविध उपक्रम-मुख्याधिकारी कंकाळ

Anuja Kudatarkar

कळणे वासियांनी किती काळ वाट पाहावी?

NIKHIL_N

अवैध प्रवासी वाहतूक करण्यावर कारवाई

Patil_p

कोकणातील मंत्री, आमदार काय कामाचे?

Omkar B