Tarun Bharat

रत्नागिरी : दापोली कस्टम विभागाने पकडले अडीच हजार किलो मास

प्रतिनिधी / दापोली

रात्रीची गस्त घालत असताना दापोली कस्टम विभागाने मंडणगड तालुक्याच्या हद्दीत लाटवण कुंबळे मार्गावरील वलवते गावाजवळ अडीच हजार किलो गोमास जप्त केले आहे. यामुळे दापोली व मंडणगड तालुक्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गोमासाची तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

दापोली कस्टम विभागाचे अधिकारी जे. एम. भोईटे हे आपले सहकारी महेश यादव, भास्कर गायकवाड, विकास आनंद, अमर मौर्य, सुहास वेलणकर, प्रसन्न शिवणकर, अमित वाडकर, अजिंक्य शिंगारे, अरुण शिगवण, दिलीप जालगावकर, उदय कदम, प्रतिक अहीवले यांच्यासह दापोली मंडणगड या दोन तालुक्यांच्या हद्दीवर सोमवारी रात्री गस्त घालत होते. त्यांना रात्री साडेबाराच्या सुमारास मुंबईकडे वेगाने जाणारी महिंद्रा बोलेरो पिकप आढळून आली. या गाडीतून रक्तमिश्रित पाणी खाली पडत होते व घाण वास येत होता. याचा त्यांना संशय आल्याने त्यांनी गाडी थांबवली व गाडी उडून गाडीचा मागील भाग उघडून पाहिला या गाडीमध्ये त्यांना सुमारे अडीच हजार किलो गोमास असल्याचे आढळून आले.

दापोली येथे आणून या सर्व गोष्टीचा पंचनामा करून या दोघांसह सर्व मुद्देमाल मंडणगड पोलिसांच्या ताब्यात देण्याकरिता सकाळीच सर्व पथक मंडणगडकडे रवाना झाले आहे. मोठ्या प्रमाणात गोमास सापडून आल्यामुळे जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Related Stories

सह्याद्री माध्यमिक विद्यालय, भडगांव बु. स्कूलचा निकाल 100 टक्के

Anuja Kudatarkar

दाऊदच्या मालमत्ता लिलावात स्थानिक ग्रामस्थांचाही पुढाकार

Archana Banage

मच्छीमार पॅकेजमधील त्रुटी दूर होतील!

NIKHIL_N

दापोलीत एसटी अपघात ४ विद्यार्थ्यांसह १४ जण जखमी

Archana Banage

पोलादपूरनजीक दरड कोसळून महामार्ग ठप्प

Patil_p

एक घर एक रोप; वी फाॅर यू संस्थेची संकल्पना; घरपोच मोफत रोपे देणार

Anuja Kudatarkar