Tarun Bharat

रत्नागिरी : दापोली पोलिसांनी उघड केले बंदूक विक्रीचे मोठे रॅकेट

16 बंदुकांसह 9 आरोपी ताब्यात

वार्ताहर / टाळसुरे

दापोली पोलिसांनी बंदूक तस्करीचे मोठे रॅकेट उघड केले आहे. या प्रकरणी दापोली पोलिसांनी 9 आरोपी सह 16 बंदुका ताब्यात घेतल्या आहेत. दापोली पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईने दापोली तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दापोली पोलिस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील शिवाजीनगर भोंजाळी येथे राहणारा अमित रहाटे वय 28 याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पेंडूर येथील नानू पेंडुरकर यांच्याकडून सुमारे 16 बंदुका विनापरवाना विक्रीकरिता दापोलीमध्ये बेकायदेशीररीत्या घेऊन आला होता.

अमित राहाटे यांच्याकडून दापोली तालुक्यातील नवशी तांबटवाडी येथील गणेश चोरगे, गिम्हवणे उगवतवाडी येथील राजाराम भुवड, जालगाव ब्राह्मणवाडी येथील अमित आलम, जालगाव सुतारकोंड येथील आशिष मोहिते, मौजे दापोली येथील सौरभ म्हसकर, जालगाव श्रीराम नगर येथील अभिषेक जाधव, सौरभ घरवाळी, मौजे दापोली येथील विजय आंबेडे यांना सुमारे 9 बंदुकांची विक्री केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे.

Related Stories

चिपळूणचे ऐतिहासिक साखळी उपोषण मागे घेणार?

Patil_p

आशा दूर ठेवल्यावर संतपद प्राप्त

Anuja Kudatarkar

बिबटय़ा कातडी प्रकरणातील आरोपीकडून सांबर शिंगेही जप्त

Patil_p

पोयरेत शाळकरी मुलाची आत्महत्या

NIKHIL_N

रत्नागिरी : धामणी येथे भक्ष्याच्या शोधात बिबट्या घुसला पेट्रोल पंपात

Archana Banage

पेरणीनंतर व्यवस्थापन शेतकऱयांना घरबसल्या मार्गदर्शन

Patil_p