Tarun Bharat

रत्नागिरी : नाराज शिवसैनिकांची आमदारांनी काढली समजूत

Advertisements

प्रतिनिधी / दापोली

दापोली शहरप्रमुखपदी झालेली निवड ही शिवसेनेतील परंपरेला धरून नसल्याचे मत नाराज गटातून आमदार योगेश कदम यांच्या समोर जाहीरपणे मांडण्यात आले. तसेच आमचा विरोध व्यक्तीला नसून ज्या पद्धतीने नियुक्ती केली आहे. त्याला असल्याचे तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत सांगण्यात आले. मात्र आमदारांनी नाराजांची समजूत काढली.

दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश प्रमुख उपस्थितीत सेनेतील पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेवून आयोजित बैठकीत शहरप्रमुखपदी झालेली निवड ही परंपरेला धरून नसल्याचे मत नाराज गटातून मांडण्यात आले. तसेच का विरोध करतोय, याबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली. यावर शहरप्रमुख राजेंद्र पेठकर यांनी आपल्याला वरिष्ठांनी जी जबाबदारी दिली आहे ती आपण पार पाडत असून मला सर्वांना सोबत घेवून दापोली शहर पुन्हा एकदा भगवेमय करायचे आहे. त्यासाठी सर्वांनी साथ द्या, असे आवाहन केले.

योगेश कदम यांनी पद हे सदासर्वकाळ आपल्याकडे रहात नाही. त्यामुळे पदासाठी कोणतीही नाराज होवू नका असे सांगत आगामी काळात दापोली शहरातून शिवसेनेला सर्वाधिक मताधिक्य कसे मिळेल यासाठी बांधणी करा, प्रत्येक व्यक्तीच्या कामगिरीचा सन्मान केला जाईल, असे सांगितले. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे यांच्यासह सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेचे दापोली शहरप्रमुख राजेंद्र पेठकर यांच्या झालेल्या निवडीबाबत तालुका कार्यकारणीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. पक्षांतर्गत असलेले सर्व मतभेद दूर झाले असून, शहर शिवसेनेवरील वादाचे वादळ आता दूर झाले आहे. असा निर्वाळा पक्षातर्फे देण्यात आला.

Related Stories

वेंगुर्लेत नरकासुर स्पर्धेचा निकाल जाहीर…पहा काय आहे निकाल ?

Anuja Kudatarkar

जिल्हा शल्यचिकित्सकांचा निष्काळजीपणा!

NIKHIL_N

40 वाहन परवाने होणार निलंबित

Patil_p

Ratnagiri : कोकण मार्गावर रेल्वेगाड्या धावताहेत विलंबानेच

Abhijeet Khandekar

वेळवंडमधील महिलेचा मारेकरी 8 दिवसांनंतरही मोकाट

Patil_p

संविधान दिनानिमित्त बोर्डिंग ग्राउंड येथे प्रास्ताविकेचे वाचन

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!