Tarun Bharat

रत्नागिरी : फेब्रुवारी २०२०पासून पंतप्रधान किसान योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित

Advertisements

शहर वार्ताहर / राजापूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना ही महत्वाकांक्षी योजना सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. मात्र, फेबुवारी 20 पासून नविन नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही याचा मोबदला मिळालेला नाही. पारूप यादीमध्ये आर्थिक उत्पन्न चांगले असलेल्या नागरिकांनीही याचा लाभ घेतला होता. अशा नागरिकांची रिकव्हरी सध्या चालू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या. त्यामध्ये ही एक योजना होय. या योजनेतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रूपये मिळत असून ते दोन-दोन हजार अशा प्रमाणे तीन टप्यामध्ये लाभार्थीच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जात आहे. प्रथम संबधित यंत्रणेकडून प्रत्येक गावाची पारूप यादी तयार करण्यात आली. या यादीमध्ये एनक दोष असल्याने काही धनदांडग्यांनी आपले नाव लाभार्थी म्हणून नोंदवून लाभ घेतला. यामध्ये सरकारी नोकर, पेंशनदार, मोठे व्यवसायिक सामिल होते. लाभार्थीच्या बँक खातेमध्ये रक्कम जमा केल्यातंनर केवायसी म्हणून आधारकार्ड घेतले असता आधारकार्डच्या आधारे बँकेला सदर लाभार्थी खरोखरच शेतकरी आहे का नाही हे कळून आले. त्यामुळे मोठा घोळ निर्माण झाला व ही बाब उघड झाली. त्यामुळे सध्या ज्या धनदांडग्यांनी याचा लाभ घेतला होता त्यांची सध्या रिकव्हरी लावली आहे.

ही बाब लक्षात येताच शेतकरी असलेला नागरीक खरोखरच या योजनेपासून वंचित राहीला आहे याची जाणिव सरकारला झाल्याने पुन्हा नावे नेंदणीचे आवाहन केले. मात्र यावेळी ऑनलाईन नावे नोंदण्याची प्रकिया राबविण्यात आली. यामुळे नोंदणी केलेला शेतकरी खरोखरच लाभार्थी आहे का हे त्यांच्या आधारकार्डवरून समजू शकले. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपली नावे नेंदवली आहेत. त्यांना अद्यापही एकही हप्ता मिळालेला नाही. याला सर्वस्वी पशासन जबाबदार आहे. फेब्रुवारी 2020 पासून या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी आपले नावे नोंदवली आहेत. त्या शेतकऱ्यांची प्रकरणे अद्यापही जिल्हास्तरावर लालफितीत अडून पडली आहेत. जिल्हास्तरावरून ही शासनाकडे सादरच केली गेली नसल्याचा रिमार्प ऑनलाईन पकियेमध्ये दिसून येत आहे.

यापुर्वी नावे नेंदविलेल्या शेतकऱ्यांना योजनेप्रमाणे लाभ मिळत आहे. शेतकऱ्यांनी आपल्याला काही रक्कम मिळेल या आशेने तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आपली नावे ऑनलाईन नोंदवली. यावेळी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दड मात्र पडला आहे. आपल्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होतील या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी अद्यापही निराशाच आली आहे.

Related Stories

… पश्चिम किनारपट्टीवर 1 हजारहून अधिक ट्रॉलर्सची घुसखोरी

Patil_p

ओटवणे येथील रहिवासी रामचंद्र परब यांचे निधन

Ganeshprasad Gogate

लुटीतील मुख्य सूत्रधारासह फरारींचा सुगावा नाहीच!

Patil_p

शिक्षकांच्या सेवा कोविडसाठी वर्ग करण्यात प्रशासन उदासीन

NIKHIL_N

सीएसआर निधीतून सायकलींचे वाटप

Ganeshprasad Gogate

कोकण रेल्वेमध्ये 58 तांत्रिक पदांची भरती प्रक्रिया

Patil_p
error: Content is protected !!