Tarun Bharat

रत्नागिरी : मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Advertisements

प्रतिनिधी / संगमेश्वर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी नुकतीच राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबई येथील कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षाची संघटनात्मक बांधणी तसेच वीजबिल विरोधी आंदोलन व इतर स्थानिक समस्यांबाबत चर्चा करून राज ठाकरे यांचे मार्गदर्शन घेतले.

लॉकडाऊन काळातील वाढीव वीजबिल विरोधात मनसेच्यावतीने महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात आले. रत्नागिरीतही मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्यावतीने दिवे बन्द आंदोलन, विजबिलांची होळी तसेच आमरण उपोषण अशी आंदोलने छेडण्यात आली.

नुकतीच पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी वीजबिलाबाबत राज्यपाल भगतसिंह कोशिहारी यांची भेट घेऊन चर्चा केली. याच धर्तीवर जितेंद्र चव्हाण यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबई येथील कृष्णकुंज निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षाची संघटनात्मक बांधणी तसेच विविध विषयांवर राज ठाकरे यांचेकडून मार्गदर्शन घेतल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी मनसे नेते शिरीष सावंत, राज ठाकरे यांचे स्वीय सहायक सचिन मोरे तसेच संजय धामनाक आदी उपस्थित होते.

Related Stories

रत्नागिरी : खेडच्या जगबुडीत सर्पमुखी माशाचा शोध

Abhijeet Shinde

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आकडा आठशे पार

Abhijeet Shinde

रत्नागिरी : आता माशांसाठीही रोगप्रतिकारक लस

Abhijeet Shinde

सॅनिटायझर प्राशन केल्याने नेपाळी महिलेचा मृत्यू

Abhijeet Shinde

अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकसह लाकूड जप्त

NIKHIL_N

जिह्यात कोरोनाचे 200 नवे रूग्ण

Patil_p
error: Content is protected !!