Tarun Bharat

रत्नागिरी : महामार्गावर वाटूळ येथे अपघात, 5 जखमी

वार्ताहर / वाटूळ

गोव्याला पर्यटनासाठी गेलेल्या बारामतीमधील कुटुंबीयांच्या ओमनी गाडीला ओणी येथील उड्डाणपुलावर अपघात घडला.. गाडी भरधाव असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजकावर जाऊन धडकली. त्यामध्ये गाडीने दोन तीन पलटी मारून अपघात झाला. हा अपघात सुमारे संध्याकाळी ७.०० दरम्यान झाला.

या गाडीतून तीन कुटुंबे प्रवास करत होती. ही कुटुंबे गोव्यावरून दापोली व दापोली वरून बारामतीला परतीचा प्रवास करणार होती. या अपघातात २ पुरुष २ महिला १ मुल जखमी झाली आहेत. त्यांना ओणी येथील आरोग्य विभागाच्या उपकेंद्रांमध्ये उपचार चालू आहेत. अपघात झाला त्या वेळेला राजापूर पोलीस स्टेशनचे हवालदार श्री. वाघाटे व श्री.जाधव यांनी ग्रामस्थांच्या मदतीने सदर जखमींना ओणी येथील उपकेंद्रांमध्ये नेण्यासाठी सहकार्य केले.

Related Stories

राजापुरात दुचाकी अपघात; कुडाळचा तरूण ठार

Abhijeet Khandekar

चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी जादा फेऱ्यांची घोषणा

Archana Banage

चिपळूणमधील ‘त्या’ प्रकरणावर भास्कर जाधवांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Archana Banage

सिद्धी गायकेने केले राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व

Anuja Kudatarkar

आणखी 99 कोरोना पॉझिटिव्ह

NIKHIL_N

‘बांधकाम’च्या निविदा प्रक्रियेवर मनसेचा घणाघात

NIKHIL_N