Tarun Bharat

रत्नागिरी : माझ्याविरोधातील हक्कभंग प्रस्ताव तातडीने स्वीकारावा

खासदार सुनील तटकरे विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांना करणार विनंती

प्रतिनिधी / खेड

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार ५ वर्षे टिकलेच पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. याचमुळे माझ्या विरोधातील हक्कभंग प्रस्तावाचा तातडीने स्वीकार करून जी कारवाई करायची असेल ती करण्यात यावी, अशी विनंती विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांच्याकडे करणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

आपण जिल्हा परिषद अध्यक्ष पाचवेळा आमदार व आता खासदार अशा वेगवेगळ्या भूमिकेतून काम करत असतानाही दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी माझ्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. राज्यातील सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा समज गैरसमज, वेगळा संदेश जावू नये, याकरिता विधानसभा अध्यक्ष पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव तातडीने स्वीकृत करण्याची विनंती करणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेमध्ये खासदार म्हणून बैठक बोलावण्याचा अधिकार आहे की नाही, हे त्यांनी तपासून पहावे व तातडीने नोटीसही काढावी. या नोटीसीला उत्तर देखील देणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

Related Stories

चिपळुणात मच्छी, चिकन, मटण छुपी विक्री!

Patil_p

आठवडाभरात विजबिल माफ करा…अन्यथा ‘मनसे’ स्टाईल आंदोलन

Patil_p

कारीवडे स्कूलला वैभववाडी रोटरी क्लब कडून लॅपटॉप, प्रिंटर भेट

Anuja Kudatarkar

कोकण किनारपट्टी भागात थंडीचा कडाका वाढणार

Patil_p

स्वप्नालीच्या झोपडीतील अभ्यासाचे झाले चीज

NIKHIL_N

रत्नागिरी : दापोलीत शाळांना पालकांच्या प्रतिसादाची प्रतिक्षा

Archana Banage