-जिह्यात बारदान पुरेशा पमाणात, पणन विभागाची माहीती
प्रतिनिधी/रत्नागिरी
जिल्हयातील चिपळूण, शिरगांव, राजापूर, पाचल व लांजा या ठिकाणी भात खरेदी चालू झाली असून बारदान पुरेशा प्रमाणामध्ये साठ्यात असून आणखी 12 हजार 500 बारदाने मार्केटींग फेडरेशन कडून प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी प्रभाकर चिले यांनी दिली.
जिल्हामधील भात उत्पादन घेणार्या शेतकर्यांकडील भात मार्केटींग फेडरेशन खरेदी करत़े यासाठी जिह्यामध्ये 14 भातखरेदी केंद्र स्थापन करण्यात आले असून चिपळूण तालुक्यामध्ये वहाळ येथे नव्याने भात खरेदी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हयातील एकूण भातखरेदी केंद्राची संख्या 15 इतकी झाली आह़े. यंदा मार्केटींग फेडरेशन 1868 प्रतिक्विंटल या दराने भाताची खरेदी करणार आह़े. यंदा परतीच्या पावसाने जिह्यातील 11 हजार हेक्टरवरील भात शेतीचे नुकसान झाले आह़े. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील भात खरेदी मध्ये घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े. गतवर्षी 15 हजार 191 क्विंटल भाताची 1 हजार 815 पतिक्विंटलने या दराने मार्केटींग फेडरेशन ने खरेदी केली होत़ी. तसेच बारदानाचा साठा पुरेशा पमाणामध्ये असून मार्केटींग फेडरेशने 12 हजार 500 अधिकचे बारदाने पाठवली असल्याचे जिल्हा पणन अधिकारी पभारकर चिले यांनी दिल़ी.


previous post
next post