Tarun Bharat

रत्नागिरी : मुंबईचे सुनी दावते ईस्लामी ट्रस्टही धावले पूरग्रस्तांच्या मदतीला

गेल्या १० दिवसांपासून कार्यकर्ते गुंतलेत मदतकार्यात, चिपळूणसह महाडमध्येही आरोग्य शिबीरे सुरूच


प्रतिनिधी / खेड


चिपळूण, महाड, खेड शहरात महापुराने बाजारपेठेसह अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या पूरग्रस्त व्यापाऱ्यांसह नागरिकांना दिलासा देण्यासाठी मुंबई येथील सुनी दावते ईस्लामी ट्रस्टही मदतीला धावली आहे. गेल्या १० दिवसांपासून कार्यकर्ते मदतकार्यात गुंतले असून आतापर्यंत २ हजाराहून अधिक कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. पुरामुळे रोगराई पसरण्याच्या शक्यतेने चिपळूण, महाडमध्ये आरोग्य शिबिरांचेही आयोजन करून औषधांचे वाटप करण्यात येत आहे.

मौलाना शाकीर नुरी, कारी रिजवान खान, रूहेब रजा यांच्या नेतृत्वाखाली तीनही तालुक्यात मदतकार्य सुरू आहे. कोकणातील भयावह पूरस्थिती ओसरल्यानंतर ट्रस्टने तातडीने पूरग्रस्त भागांचे सर्वेक्षण केले. पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबियांसह व्यापाऱ्यांना नेमकी कोणत्या मदतीची आवश्यकता आहे, याचा सलग तीन दिवस सर्वे करण्यात आला. या सर्वेक्षणानंतरच ट्रस्टने जीवनावश्यक वस्तूंसह चिपळूण, महाड तालुक्यात आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला.

पूरस्थिती ओसरल्यापासून महाड व चिपळूणमध्ये आरोग्य शिबिरांसह मोठ्या प्रमाणात औषधांचे वाटप केले. यापुढेही आरोग्य शिबिरांद्वारे मदतकार्य सुरूच राहणार आहे. ५० हून अधिक वैद्यकीय अधिकारी या उपक्रमात सहभागी झाले आहेत. तर मदतकार्यात शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. पूरग्रस्तांना तीन टप्प्यात मदत करण्यात येणार असून उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबियांची माहिती घेवून त्यांनाही उभारी देण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे कारी रिजवान खान यांनी सांगितले.

Related Stories

प्रयोगशील व्हा, प्रवाहात टिकाल!

Anuja Kudatarkar

पती मुलीला ओरडल्याच्या रागातून विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न

Archana Banage

रत्नागिरी जिल्ह्यात नवे ८ पॉझिटिव्ह, तर १३ रुग्ण बरे

Archana Banage

आजीसोबत गावी येताना साहीलवर काळाचा घाला

NIKHIL_N

दापोली तालुका प्रशासन ‘हाय अलर्ट’वर

Patil_p

कोरोना प्रतिबंधासाठी सूक्ष्म नियोजन करा

NIKHIL_N