Tarun Bharat

रेवदंडा समुद्रात मालवाहतुकीचे बार्ज कलंडले

Advertisements

-16 खलाशांना सुखरूप काढले बाहेर

-भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरचे 5 तास बचावकार्य

प्रतिनिधी/खेड, महाड

मुंबई येथून साळाव जेएसडब्ल्यू कंपनीचा कार्लो घेऊन निघालेले एम. व्ही. मंगलम् मुंबई 2562 बार्ज गुरुवारी सकाळी 7.30 च्या सुमारास रायगड जिल्हÎातील रेवदंडा समुद्रात कलंडले. भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरमधून करण्यात आलेल्या 5 तासांच्या बचाव कार्यानंतर बार्जमध्ये अडकलेल्या 16 खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

 कॅप्टन सुदाम दिनाथ (आगरतळा-त्रिपुरा), सीररा राजू (आंध्रप्रदेश), मंतन्व्य राज (हजीपूर-बिहार), संतोषकुमार अत्री (उत्तरप्रदेश), एस. के. मुसियर रहमान (अकालमेघ), मयंक डी. तांडेल (गुजरात), अमित निशाद (अलाहाबाद), एम. डी. सर्फराज (अलाहाबाद), पवनकुमार गुप्ता (उत्तरप्रदेश), मोहम्मद कैफ (अलाहाबाद), समीर विश्वकर्मा (हरियाणा), रमेशकुमार गुप्ता (उत्तरप्रदेश), साफत मोहम्मद (अलाहाबाद), मनोजकुमार जसवाल (अलाहाबाद), पंकजकुमार पटेल (अलाहाबाद), मिलन एस.के. (पश्चिम बंगाल) अशी बचावलेल्या खलाशांची नावे आहेत.

 एम. व्ही. मंगलम् बार्ज सकाळी 7.30 च्या सुमारास रेवदंडानजीकच्या कोलेई समुद्रात पोग्नेहोचले. सोसाटÎाच्या वाऱयासह पावसाने जोर धरल्याने अचानक बार्ज कलंडून आतमध्ये पाणी शिरले. बार्जमधूनच साळाव-जेएसडब्ल्यू कंपनीत संपर्क साधून बार्ज कलंडल्याचे कळवले. कंपनीनेही रेवदंडा येथील बंदर प्रादेशिक विभाग, पोलीस स्थानक यांना खबर दिल्यानंतर साऱया यंत्रणांची धावाधाव सुरू झाली.

 पोलीस उपअधीक्षक सचिन गुंजाळ, रेवदंडा पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम, पोलीस निरीक्षक अशोक थोरात, बंदर प्रादेशिक विभागाचे बंदर अधिकारी चौकेश्वर लेपांडे, रेवदंडा बंदर निरीक्षक अमर पालवणकर, अलिबाग बंदर अधीक्षक अरविंद सोनावणे, साळाव जेएसडब्ल्यू जेटीकडे पोहोचले. भारतीय तटरक्षक दलास संपर्क केल्यानंतर मुरूड कोस्टल गार्डही घटनास्थळी दाखल झाले.

 बार्जमध्ये पाणी शिरल्याने ते कोणत्याही क्षणी पाण्यात बुडण्याची शक्यता होती. यामुळे तातडीने भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आले. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचावकार्य हाती घेत बार्जमध्ये अडकलेल्या 16 खलाशांना सुखरूपपणे बाहेर काढून रेवदंडा समुद्रकिनारी उतरवण्यात आले. यासाठी भारतीय तटरक्षक दलाचे कमाडंट अरुणकुमार सिंग यांच्यासह स्टेशन कमाडंट, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, पोलीस यंत्रणा यांनी विशेष परिश्रम घेतले…

Related Stories

जिल्हय़ात ‘कोविड-19’ साठी टास्क फोर्स

NIKHIL_N

जिह्यात कोरोनाने दोघांचा मृत्यू , 132 नवे रुग्ण

Patil_p

चाकरमान्यांच्या एसटीला अपघात

Patil_p

दहा हजार शेतकऱयांच्या भात पिकाची नासाडी

NIKHIL_N

कोंडसर बु. मध्ये आढळला घराच्या परिसरात बिबट्याचा मृत बछडा

Archana Banage

अचलच्या जगण्याला उमेद…

NIKHIL_N
error: Content is protected !!