प्रतिनिधी / लांजा
मुंबई-गोवा हायवेवर कंटेनरला अपघात झाल्याने आज सकाळपासून महामार्गावरील वाहतूक सुमारे 5 तास ठप्प होती. लांजा तालुक्यातील वेरळ गावाजवळच आज सकाळी साडेसहा वाजता हा अपघात झाला. साडे अकराच्या सुमारास हा कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरू करण्यात यश आले. खासगी बसने ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे.

