Tarun Bharat

रत्नागिरी : विनापरवाना बंदूक बाळगल्याप्रकरणी डावखोल येथील एकावर गुन्हा दाखल

Advertisements

प्रतिनिधी / संगमेश्वर

खाडीभागातील डावखोल कडेवठार येथे विनापरवाना बंदूक बाळगल्याप्रकरणी संतोष शांताराम सागवेकर यांच्याविरोधात संगमेश्वर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष शांताराम सागवेकर रा. डावखोल कडेवठार यांच्याकडे विनापरवाना ठासणीची बंदूक किंमत रुपये अठरा हजार रुपयांची असल्याची खबर मिळताच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने धाड टाकून त्यांना रंगेहात पकडले.

पोलीस नाईक बाळू रमेश पालकर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून संतोष सागवेकर यांच्यावर विना परवाना बंदूक बालगल्याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने केलेल्या धडक कारवाईमुळे विनापरवाना बंदूक बाळगणाऱ्याचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

Related Stories

‘महाविकास’ची सरशी, राजापुरात सेनेला ठेंगा

Patil_p

रत्नागिरी नगर परिषदेचे बदलते धोरण

Patil_p

संगमेश्वर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक

Patil_p

शिरोळमध्ये जुगार अड्यावर छापा सात जण ताब्यात

Abhijeet Shinde

मुंबईतून निघालेल्या रेल्वे गाडय़ांना चाकरमान्यांचा अत्यल्प प्रतिसाद

Patil_p

सावंतवाडी जिमखाना येथील घळण कोसळली

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!