Tarun Bharat

रत्नागिरी : शिक्षक आले…पण विद्यार्थी अत्यल्प

आजपासून इ.९ वी ते १२ वीचे वर्गांना प्रारंभ

प्रतिनिधी / रत्नागिरी

नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग आज सोमवारपासून सुरू झालेत. विद्यार्थी स्वागतासाठी सर्व शाळांनी तयारी केलेली होती. पण विद्यार्थ्यांची अत्यल्प हजेरी यादिवशी लाभली, मात्र शिक्षकांची उपस्थिती पुरेपूर राहिली आहे.

कोरोना सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 2 हजार 519 शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत 2 हजार 281 पालकांनी संमतीपत्रे दिली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी दिली. शाळेत सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांची संख्या आणि आसनव्यवस्था लक्षात घेऊन सकाळ आणि दुपार सत्रात शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय व्यवस्थापनाने घ्यायचा आहे. शाळा सुरु झाल्यात. स्वागतासाठी शाळांच्या गेटवर संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीपण सज्ज होते. पण विद्यार्थ्यांच्या अल्प प्रतिसादाने शाळा देखील बुचकाळ्यात पडल्या आहेत.

Related Stories

आत्मनिर्भर अभियान पॅकेज चाकरमान्यांपर्यंत पोहोचविणार!

NIKHIL_N

८ जानेवारीला तळवडे येथे होणार शेतकरी मेळावा

Anuja Kudatarkar

रक्त दरवाढ विरोधात शनिवारी रक्तदान आंदोलन!

Anuja Kudatarkar

Ratnagiri : ऐन गणेशोत्सवात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन बंगले फोडले

Abhijeet Khandekar

रेशनकार्डला ओळखपत्राचा दर्जा,अनेकांमध्ये संभ्रमावस्था

Archana Banage

पाणी योजनेचा कोटय़वधीचा खर्च ‘पाण्यात’!

Patil_p