Tarun Bharat

रत्नागिरी : संगमेश्वर जवळ कार अपघात, महिला जखमी

Advertisements

प्रतिनिधी / संगमेश्वर

मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर जवळच्या रामकुंडवळणावर मुंबईहुन रत्नागिरीला दिशेने जाणारी कार संगमेश्वर जवळच्या रामकुंड वळणावर आली असता गाडी चालकाचा ताबा सुटल्याने पुलाच्या कठड्यावर जावून आदळली. हा अपघात दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडला.

कार चालक परशुराम पुरुषोत्तम ठाकूर रा रत्नागिरी फिनोलॅक्स कॉलनी हे मुंबई हुन रत्नागिरी ला येत होते. ते संगमेश्वरजवळच्या रामकुंड वळणावर आले असता त्यांचा गाडीवरील ताबा सुटला त्यामुळे गाडी पुलाच्या कठड्यावर जावून जोरदार आदळली त्यामुळे गाडीच्या दर्शनीचा भाग चेपला गेला. कार मधील महिला जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कंटेनरच्या प्रसंगवधानामुळे मोठा अनर्थ टळला

रामकुंड वळणावर कार चालक विरुद्ध दिशेने समोर धडक देणार हे समजताच कंटेनर क्रमांक डी एन 09 व्ही 9625 यांने तात्काळ समोरील होणारी धडक वाचविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या प्रसंगधानामुळे जीवीत हानी टळली. मात्र कंटेनरच्या मागील बाजूस कार आदळली. कंटेनर हा गोव्यातून मुंबईच्या दिशेने जात होता. अपघाताचे वृत्त समजताच संगमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Related Stories

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान धावले गंभीर रुग्णाच्या मदतीला…

Anuja Kudatarkar

हर्णेत बोगस पंचनाम्यावरून हंगामा

Patil_p

कोकण रेल्वेने केला गाडय़ांचा वेग कमी

Patil_p

नारशिंगे गावच्या तेजस्वी आग्रे हिची कबड्डी स्पर्धेत निवड

Patil_p

‘निसर्ग’ची 152 कोटी 42 लाख नुकसान भरपाई वितरित

Patil_p

मनसेतर्फे सावंतवाडी पत्रकारांना मास्क, सॅनिटायझर आणि ऑक्सिमीटरचे वाटप

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!