Tarun Bharat

रत्नागिरी : सिव्हीलमध्ये केवळ २०० डोस शिल्लक!

Advertisements

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. फुले यांची माहिती, लवकरच लस उपलब्ध होण्याची अपेक्षा ः दुसऱया टप्प्यातील स्थिती

प्रतिनिधी / रत्नागिरी

जिल्हा शासकीय रुग्णालयात दुसऱया डोससाठी केवळ 200 डोस शिल्लक असून लसीकरणाचा इतर साठा संपला आहे. ही समस्या सगळीकडे आहे, मात्र लवकरच नवीन साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.

 जिह्यातील सर्वच कोरोना लसीकरण केंद्रावर केवळ दुसऱया टप्प्यातील लस अल्प प्रमाणात उपलब्ध आहेत. बहुतांश ठिकाणी पहिला डोस थांबविण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयात दुसऱया लसीचे गुरुवारी फक्त 200 डोस शिल्लक आहेत. लस उपलब्ध नसल्याने बऱयाच लसीकरण केंद्रावर लोक माघारी जात आहेत, मात्र लवकरच लसीची उपलब्धता होईल, असे सांगण्यात आले. 

पुरेसा साठा असल्याची दिली जातेय माहिती

लसीची उपलब्धता संपूर्ण महाराष्ट्रात मर्यादित आहे. ही वस्तूस्थिती असल्याचे अधिकारी मान्य करत असताना काही आरोग्य अधिकाऱयांकडून मात्र  पुरेसा साठा असल्याचे पत्रकारांना सांगितले जात आहे.

दापोलीत कोविड लसीकरण बंद

दापोली : उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण बंद ठेवल्याची नोटीस

मौजेदापोली / वार्ताहर

दापोलीत युद्धपातळीवर कोविड लसीकरणाचे सुरु असताना लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे गुरुवारी लसीकरण बंद ठेवण्यात आले. दापोली आरोग्य विभागाकडे एकही डोस उपलब्ध नाही. गुरूवारपासून लसीकरण बंद करण्यात आल्याची नोटीस उपजिल्हा रूग्णालयात लावण्यात आली आहे. लस  उपलब्ध होताच पुन्हा लसीकरण सुरु केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

खेड नगर परिषदेचे लसीकरण केंद्र बंद

खेड येथील नगर परिषदेच्या लसीकरण केंद्रातील लसीचा साठा संपल्यामुळे गुरुवारपासून लसीकरण बंद करण्यात आल्याचे ध्वनीवर्धकाद्वारे जाहीर केले. लसीचा साठा पूर्ववत झाल्यानंतर लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

अत्यावश्यक सेवेतील सर्वांना लसीकरण व्हावे

अत्यावश्यक सेवांमधील 25 वर्षापुढील सर्व व्यक्तींचे लसीकरण व्हावे, अशी मागणी गुहागर शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी केली आहे. राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन केले आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याने अशा सेवेतील सर्व कर्मचाऱयांचे लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Related Stories

जैतापूर प्रकल्पबाधितांना नोकरीची संधी

Patil_p

जिल्ह्यात कोविड ची ‘ड्राय रन’ मोहीम यशस्वी

Archana Banage

एका महिन्यात अवैध मासेमारी बंद करणार

Patil_p

शासकीय वैद्यकीय कॉलेज जिल्हा रुग्णालय परिसरातच होणार!

NIKHIL_N

पाटच्या दाभोलकर कुटुंबाला अठरा वर्षांनी मिळाली शिधापत्रिका

NIKHIL_N

कोरोना लसीकरण रंगीत तालीम आज

NIKHIL_N
error: Content is protected !!