Tarun Bharat

रथसप्तमीनिमित्त कोडोली बसस्थानकात प्रवासी दिन साजरा

प्रतिनिधी / वारणानगर  :

          कोडोली ता. पन्हाळा येथील बसस्थानकात रथसप्तमीनिमित्त प्रवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोडोली बसस्थानकांमध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या मार्फत रथसप्तमी व प्रवासी दिनाचे औचित्य साधून प्रवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना प्रमोदनी माने यानी जर दिशा योग्य असेल तर दशा होणार नाही, या करिता जीवनात योग्य दिशेची गरज असते. या योग्य दिशेकडे पोहोचविण्याचे काम एसटी महामंडळ करीत आहे. या एसटी महामंडळामुळे आम्ही योग्य दिशेला पोहोचतो असे मत व्यक्त केले.

        यावेळी बसचे पूजन प्रमोदिनी माने व वारणा दूध संघाचे माजी संचालक व जेष्ठ नागरिक मोहन जगदाळे (मोहरे) यांनी केले. यावेळी चालक, वाहक व वाहतूक नियंत्रक यांचा सत्कार करणेत आला व प्रवाशांना तिळगुळ पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. वाहतूक नियंत्रक अशोक मोहिते, गजानन पळस यांनी एसटीच्या विविध सवलतीची व सुरक्षित प्रवास यासंबंधी माहिती देत मनोगत व्यक्त केले. तसेच ग्राहक पंचायतीचे प्रवीण बुरांडे यांनी रथसप्तमी आणि प्रवासी दिनाचे महत्त्व सांगून प्रवाशांचे हक्क अधिकार व कर्तव्य यांची जाणीव करून दिली व प्रवाशांनी खाजगी वाहनातून प्रवास न करता एसटीने प्रवास करण्याचे आवाहन केले.

         यावेळी राजेंद्र पेटकर, सुखनाथ जाधव, रामचंद्र चौथरे, गोपाळ शेट्टी, कृष्णाथ माळी, राहुल हुजरे यांच्यासह चालक, वाहक तसेच प्रवासी नागरिक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Stories

दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या प्रयत्नांना यश, म्हारुळ ग्रामपंचायत बिनविरोध

Archana Banage

वीरशैव बँकेची निवडणूक बिनविरोध

Archana Banage

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा

Archana Banage

मेघोली अपघात हा `डाऊनस्ट्रिम’ केसिंगमुळेच..!

Archana Banage

देशातील वाढत्या बलात्कारांच्या विरोधात शिरोली येथे आंदोलन

Archana Banage

covid-19; आता नाकाद्वारे घ्या, करोना प्रतिबंधात्मक डोस

Rahul Gadkar
error: Content is protected !!