Tarun Bharat

रमेश कांदेकर बनले ‘कोरोना योद्धा’

अनेक संस्थांकडून कोरोना योद्धा पुरस्काराने गौरव, -डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत

कोल्हापूर / प्रतिनिधी

डी.वाय.पाटील हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी रमेश कांदेकर यांचे कोरोना महामारीतील कामकाज उल्लेखनीय ठरले आहे. या हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच कांदेकर हे देखील २४ तास रुग्णसेवेत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जीवन आधार फौंडेशन, संत रोहिदास सेवाभावी संस्था, मुंबई अशा अनेक संस्थानी त्यांना ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मानित केले आहे.

कोल्हापूर शहरांसह जिल्ह्यातील मोठ्या हॉस्पिटल्समध्ये जाणाऱ्या रुग्णांबरोबरच त्यांचे नातेवाईकही गोंधळलेले असतात. कोरोना महामारीच्या कालावधीत तर कोणत्या हॉस्पिटल्समध्ये बेड उपलब्ध होतील याची माहिती मिळणे कठीण आहे. ही माहिती नसल्यामुळेच अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. अशा कठीण परिस्थितीतही स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्य रुग्णांच्या मदतीसाठी धावून जाणारा अवलिया म्हणजे रमेश कांदेकर असे म्हणावे लागेल. दिवसा असो अथवा मध्यरात्री, कधीही फोन केल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना सर्व माहिती देण्याबरोबरच त्यांना बेडची व्यवस्था करुन देण्यासाठी ते शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मोठ्या हॉस्पिटल्समधील सर्व जनसंपर्क अधिकाऱ्यांचा एक व्हॉट स्अॅप ग्रुप आहे. या ग्रुपवर कोणत्या हॉस्पिटल्समध्ये किती बेड शिल्लक आहेत, याची माहिती कांदेकर यांना मिळते. त्यामुळे डि.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसतील तर इतर हॉस्पिटल्समध्ये ते रुग्णांची सोय करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्या नातेवाईकांना धीर देतात. त्यांच्या या अहोरात्र केल्या जाणाऱ्या कामाची दखल घेऊनच अनेक सामाजिक संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे.

सामाजिक संस्थेच्या माध्यमातूनही कांदेकर यांचे समाजकार्य
कांदेकर यांनी जय बजरंग मल्टपर्पज फौंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, नेत्ररोग तपासणी, शस्त्रक्रीया शिबीर, विविध आजारांवरती मोफत शस्त्रक्रिया शिबीर, वंचितांना मोफत फराळ वाटप, जेवण वाटप आदी विविध उपक्रम राबविले आहेत. तसेच स्वच्छता मोहितेसह हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपासह सरकारी सुविधा मिळवून देण्याचे कार्य केले आहे. सध्या ते ‘वडार महाराष्ट्राचा’ या संस्थेचे करवीर तालुकाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.

Related Stories

साहित्यिका अनुराधा गुरव यांच्या स्मृती दिनी आज ऑनलाईन कार्यक्रम

Archana Banage

बेघर मानसिक रुग्णांचा प्रश्न गंभीर

Archana Banage

…32 वर्षे अंथरुणावर खिळून पडलेल्या पतीची सेवा-सुश्रुषा!

Abhijeet Khandekar

क्षेत्र नृसिंहवाडी : दत्तभक्तांना प्रतीक्षा दक्षिणद्वार सोहळ्याची

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 1071नवे रुग्ण तर 31 बळी

Archana Banage

पाचगावचे ग्रामसेवक स्वॅब द्या सांगून दमले….

Archana Banage
error: Content is protected !!