Tarun Bharat

रविनाची वेबसीरिज 10 डिसेंबरला ओटीटीवर

Advertisements

‘अरण्यक’ नेटफ्लिक्सवर पाहता येणार

अभिनेत्री रविना टंटन लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वतःचे पदार्पण करणार आहे. अरण्यक या स्वतःच्या वेबसीरिजवरून ती सध्या चर्चेत आहे. या वेबसीरिजच्या प्रदर्शनाची तारीख आता समोर आली आहे. अरण्यक ही सीरिज 10 डिसेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केली जाणार आहे. रविनाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत याची माहिती दिली आहे.

‘एक अशी कहाणी ज्यामागे लपल्या आहेत आणखी अनेक कथा. जाणून घ्यायचे असल्यास पहा ‘अरण्यक’. 10 डिसेंबर रोजी केवळ नेटफ्लिक्सवर’ असे तिने नमूद केले आहे. निर्मात्यांनी सीरिजमधील रविनाचा लुक देखील शेअर केला आहे.  यात ती एका पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत दिसून आली आहे.  तसेच निर्मात्यांनी एक मिनिटाचा टीजर व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या सीरिजचे दिग्दर्शन विनय वैकुल यांनी केले आहे. सीरिजमध्ये परमव्रत चटर्जी आशुतोष राणा, जाकिर हुसैन आणि मेघना मलिक हे कलाकार दिसून येणार आहेत. रॉय कपूर फिल्म्स आणि रमेश सिप्पी एंटरटेन्मेंटकडून याची निर्मिती करण्यात आली आहे. एक रहस्यपूर्ण सुपरनॅचरल थ्रिलर स्वरुपाची ही सीरिज आहे. या बहुप्रतीक्षित सीरिजचे लेखन चारुदत्त आचार्य यांनी केले आहे. या वेबसीरिजची कहाणी एक विदेशी पर्यटक शहरात गायब होण्याची संबंधित आहे.

Related Stories

प्रियांकाने विकली मुंबईतील मालमत्ता, भाड्याने दिले ऑफिस

Patil_p

ओटीटी हे कलाकारांसाठी वरदान

Patil_p

ललित मोदींनी इन्स्टाग्राम बायोमध्ये केला बदल; म्हणाले, अखेर मी माझ्या…

Abhijeet Khandekar

महिलांना प्रोत्साहन देणार नेटफ्लिक्स

Patil_p

मेहनत करत रहा….

Patil_p

आई कुठे काय करते‘ मालिकेत नवं वळण

Patil_p
error: Content is protected !!