Tarun Bharat

रविनाला सुवर्ण, कीर्तीला रौप्य

युवा विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप ः भारताला एकूण 11 पदके

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

स्पेनमधील ला नुसिया येथे झालेल्या आयबीए युवा महिला-पुरुष विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताची युवा आशियाई चॅम्पियन रविनाने सुवर्णपदक पटकावले तर कीर्तीला रौप्यपदक मिळाले. या स्पर्धेत भारताने एकूण 11 पदकांची कमाई केली.

महिलांच्या 63 किलो वजन गटात रविनाची जेतेपदाची लढत नेदरलँड्सच्या मेगन डीक्लेरविरुद्ध झाली. या लढतीत रविनाने चांगली सुरुवात केली नाही. तरीही तिने तांत्रिक क्षमता व जलद हालचाली यांच्या जोरावर मुसंडी मारली. अतिशय चुरशीने लढली गेलेली ही लढत अखेर रविनाने 4-3 अशा फरकाने जिंकत सुवर्ण निश्चित केले. या लढतीचा रिव्हय़ू पाहिल्यानंतर अंतिम निर्णय दिला गेला.

अन्य एका लढतीत महिलांच्या 81 किलोवरील गटात कीर्तीला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. आयर्लंडच्या युरोपियन युवा चॅम्पियन क्लिओना एलिझाबेथ डार्सीने तिच्यावर 5-0 अशी मात करीत सुवर्ण मिळविले.

या स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनीच पूर्ण वर्चस्व राखले होते. 25 स्पर्धकांनी भाग घेत भारताने एकूण 11 पदके पटकावली. त्यात चार सुवर्ण, 3 रौप्य व 4 कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताच्या 25 पैकी 17 स्पर्धकांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. स्पर्धेत सहभागी झालेल्या अन्य कोणत्याही देशाच्या स्पर्धकांना अशी कामगिरी करता आली नाही. भारतीय महिलांनी एकूण 8 पदके पटकावली. इतर देशांच्या तुलनेत ही या स्पर्धेतील सर्वाधिक पदके ठरली. कझाकच्या महिलांनी 5 व उझ्बेकच्या महिलांनी 4 पदके पटकावली. रविना (63 किलो), देविका घोरपडे (52 किलो) या दोघींनी सुवर्णपदके, कीर्ती (81 वरील), भावना शर्मा (48 किलो) यांनी रौप्य व मुस्कान (75 किलो), लशू यादव (70 किलो), कुंजाराणी देवी (60 किलो), तमन्ना (50 किलो) यांनी कांस्यपदके मिळविली.

पुरुष विभागात युवा आशियाई चॅम्पियन वंशज (63.5 किलो), विश्वनाथ सुरेश (48 किलो) यांनी सुवर्णपदके मिळविली तर आशिष (54 किलो) याने रौप्यपदक मिळविले. या स्पर्धेत सुमारे 600 स्पर्धकांनी भाग घेतला होता.

Related Stories

अचंता शरथ कमलचे खेलरत्नसाठी नामांकन

Patil_p

डु प्लेसिसच्या शतकाने दक्षिण आफ्रिकेला आघाडी

Patil_p

चीन, जपानमधील टेनिस स्पर्धा रद्द

Patil_p

अँडी मरेचे विजयी पुनरागमन

Patil_p

तैवानमध्ये बेसबॉल हंगामाला सुरुवात

Patil_p

नजीकच्या भविष्यात देशात क्रीडास्पर्धा अशक्य : रिजीजू

Patil_p