Tarun Bharat

रविवारीच पार पडणार ‘नीट’

परीक्षा टाळण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर रोजी होणारी नीट (वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा) टाळण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. नीट युजी एक्झाम 2021 ही अन्य कुठल्या तारखेला आयोजित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली आहे.

त्याचदिवशी अन्य परीक्षा होणार असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्याने केला होता. नीट निर्धारित दिवशी म्हणजेच रविवारी 12 सप्टेंबर रोजी आयोजित केली जाणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

‘नीट’मध्ये 16 लाखांहून अधिक विद्यार्थी सामील होतात आणि केवळ काही विद्यार्थ्यांच्या याचिकेवर परीक्षा टाळली जाऊ शकत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायाधीश ए.एम. खानविलकर, हृषिकेश रॉय आणि सी.टी. रवि कुमार यांच्या खंडपीठासमोर याचिकांवर सुनावणी झाली आहे.

परीक्षेचा निकाल अद्याप न लागलेले विद्यार्थी देखील ‘नीट’मध्ये सामील होTि शकतील असे नॅशनल टेस्टिंग एजेन्सीने 3 सप्टेंबर रोजी स्पष्ट केले होते. परीक्षेचा निकाल कौन्सिलिंगवेळी आवश्यक ठरणार असल्याचे एजेन्सीने सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयात ‘नीट’ला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका ऍडव्होकेट सुमंथ नकुला यांनी दाखल केली होती.

वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी होणारी राष्ट्रीय पात्रता सहप्रवेश परीक्षा (नीट) 12 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. कोरोना विषयक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना केंद्रावर मास्क उपलब्ध केले जाणार आहेत. संपर्करहित नोंदणी, योग्य साफ-सफाई, सोशल डिस्टन्सिंगसोबत बसण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

Related Stories

पाकिस्तानात आले 1 हजार रुपये, तर सिमला मिरची 200 रुपये किलो

datta jadhav

आंध्रप्रदेश सरकारने घेतला विधान परिषद बरखास्त करण्याचा निर्णय

prashant_c

अग्निवीरांना बीएसएफमध्ये 10 टक्के आरक्षण

Patil_p

बडगाम चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

पेट्रोल – डिझेलच्या दरांत पुन्हा वाढ; मुंबईत पेट्रोल शंभरीपार

Tousif Mujawar

सत्यजित तांबे यांची अपक्ष उमेदवारी; विधान परिषद निवडणुकतून सुधीर तांबे यांची माघार

Abhijeet Khandekar