विकेंड कर्फ्यूला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


बेळगाव : रविवारी विकेंड कर्फ्यू असला तरी खरेदीसाठी व इतर कामांसाठी नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही. कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत असल्यामुळे राज्य सरकारने 55 तासांचा विकेंड कर्फ्यू जाहीर केला होता. शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेला हा विकेंड कर्फ्यू सोमवारी सकाळपर्यंत असणार आहे. रविवारी देखील शहर व परिसरात विकेंड कर्फ्युमुळे सर्वत्र शुकशुकाट व शांतता पहायला मिळाली. कोरोना आटोक्मयात आणण्यासाठी आतापासूनच राज्य सरकारकडून निर्बंध घातले जात आहेत.


नाईट कर्फ्यूसोबतच मागील आठवडय़ापासून विकेंड कर्फ्यू सुरू करण्यात आला. अत्यावश्यक सेवा, दूध विक्री, भाजी व फळ विक्री या व्यतिरिक्त इतर सर्व व्यवहार ठप्प ठेवण्यात आले आहेत. शनिवारप्रमाणेच रविवारी देखील नागरिकांनी घरीच राहून विकेंड कर्फ्यूमध्ये सहभाग दर्शविला. यामुळे रस्त्यांवरील वाहतूक मंदावली होती.
रविवारी नोकरदारांना साप्ताहिक सुटी असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात खरेदीसाठी गर्दी होते. या रविवारी मात्र विकेंड कर्फ्यूमुळे नागरिकांना खरेदीसाठी बाहेर पडता आले नाही. शहरात दवाखाने, मेडिकल, किराणा मालाची दुकाने, हॉटेलमधील पार्सल व्यवस्था, कुरियर, एलपीजी गॅसचे वितरण सुरू होते. कोरोनाचा धोका वाढल्याने नागरिकांनी घरीच राहून आपल्या कुटुंबासमवेत विकेंडचा आनंद लुटला.


गरिबांच्या बाजारात शुकशुकाट
गरीबांचा बाजार म्हणून ओळखला जाणारा ‘खासबाग बाजारात’ रविवारी शुकशुकाट होता. प्रत्येक रविवारी नाथ पै चौकपासून खासबाग येथील बसवेश्वर सर्कलपर्यंत हा बाजार भरतो. केवळ भाजीपालाच नाहीतर गृहोपयोगी साहित्यही या बाजारात मिळते. अत्यंत माफक दरात साहित्य व वस्तू मिळत असल्याने मोठय़ा प्रमाणात ग्राहकांची गर्दी होते. वडगाव, खासबाग, जुनेबेळगाव, शहापूर, टिचर्स कॉलनी, श्रृंगेरी कॉलनी, होसूर, हिंदवाडी या परिसरातील नागरिक खरेदीसाठी येथे येतात. परंतु रविवारी विकेंड कर्फ्युमुळे हा बाजार भरू शकला नाही.
ग्राहकांविना भाजीविपेते हवालदिल
विकेंड कर्फ्यू असल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिक बाजारपेठेकडे फिरकलेच नाहीत. यामुळे रविवारी शहर व परिसरात ग्राहकच नसल्याने भाजीविपेते हवालदिल झाले होते. सकाळपासून भाजी विक्रीचे स्टॉल मांडूनही ग्राहक नसल्याने दुपारनंतर अनेकांनी दुकाने बंद करून घरी जाणे पसंत केले. बऱयाच ठिकाणी ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसलेले भाजी विपेते पहायला मिळत होते. काकतीवेस रोड, कांदा मार्केट, समादेवी गल्ली या परिसरात तुरळक प्रमाणात भाजी विपेते दिसून आले.