Tarun Bharat

रविवारी सर्वपक्षीय बैठक; PM मोदीही राहणार उपस्थित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी रविवारी (दि. 28) सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक होणार आहे. पंतप्रधान मोदीही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत विरोधी पक्षांसोबत संसदेच्या सुरळीत कामकाजावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ते 23 डिसेंबरला संपण्याची शक्यता आहे. अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदा मागे घेण्याचा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. संसदेबाहेर शेतकरी आणि आतील विरोधकही एमएसपी गॅरंटी कायद्याबाबत सरकारला वेठीस धरणार आहेत. दरम्यान, या सर्वपक्षीय बैठकीनंतर रविवारी संध्याकाळी भाजपच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे.

Related Stories

नेताजी बोस यांच्या जयंतीला पराक्रम दिन

Patil_p

सरन्यायाधीशपदी एन. व्ही. रमण शपथबद्ध

Patil_p

9,136.89 कोटी रुपयांचे कृषी कर्ज वितरण

Patil_p

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा

Abhijeet Khandekar

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

मुलांच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर कफील खान बडतर्फ

Omkar B