Tarun Bharat

रविवारी 601 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

प्रतिनिधी/ बेळगाव

रविवारी  601 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून एकूण बाधितांची संख्या 17 हजारवर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासांत तिघा जणांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाकडून उपलब्ध माहितीनुसार बेळगाव तालुक्मयातील 171 जणांचा यामध्ये समावेश आहे. शहर व उपनगरांमधील 113 व ग्रामीण भागातील 58 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांत बेळगाव येथील 2 व अथणी येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या 388 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. मृतांचा सरकारी आकडा 240 वर पोचला असून प्रत्यक्षात हा आकडा अनेक पटीने अधिक आहे. आतापर्यंत 13 हजारहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 3100 सक्रिय रुग्ण आहेत.

जिल्हय़ातील 1 लाख 22 हजार 271 जणांची आतापर्यंत स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. 1 लाख 4 हजार 613 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 17 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अद्याप 27 हजार 182 जण चौदा दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. सरकारी अहवालानुसार 252 जणांचे अहवाल यायचे आहेत.

खणगाव, मंडोळी, कडोली, के. के. कोप्प, कंग्राळी बी. के., गौंडवाड, सरस्वतीनगर, धामणे, सांबरा, हिंडलगा, उचगाव, येळ्ळूर, भेंडीगेरी, देसूर, गजपती, वडगाव, श्रीनगर, शिवबसवनगर, अनगोळ, बाजार गल्ली-वडगाव, सहय़ाद्रीनगर, मुजावर गल्ली, महांतेशनगर, ऑटोनगर, रामतीर्थनगर, समर्थनगर, सदाशिवनगर परिसरात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

भडकल गल्ली, हिंदवाडी, राजहंस गल्ली-अनगोळ, टिळकवाडी, बिम्स कॅम्पस, आदर्शनगर-वडगाव, उद्यमबाग, राणी चन्नम्मानगर, भारतनगर, लक्ष्मी टेकडी, सारथीनगर, खंजर गल्ली, वंटमुरी कॉलनी, संगमेश्वरनगर, जेड गल्ली-शहापूर, मजगाव, गुरुप्रसादनगर, जाधवनगर, कुमारस्वामी लेआऊट, बसवन कुडची, रामनगर वड्डरवाडी, टीचर्स कॉलनी खासबाग, सिटी पोलीस लाईन, हिंदवाडी, विजयनगर परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

म.ए.समितीच्या कोविड सेंटरला मदतीचा हात

Amit Kulkarni

विधिमंडळ हिवाळी अधिवेशन २०२२ बेळगांव

Amit Kulkarni

मुख्यमंत्री बोम्माई ‘फॉक्सकॉनच्या गुंतवणुकीवर लोकांची दिशाभूल करत असल्याचा काँग्रेसचा आरोप

Abhijeet Khandekar

चिखले धबधब्यावरील अवैध वसुली थांबवली !

Tousif Mujawar

चर्चेनंतरच शाळा-महाविद्यालये सुरू होणार

Patil_p

पत्नी, सासू-सासऱयावर विळय़ाने हल्ला

Omkar B