Tarun Bharat

रविवार पेठेतील सैनिकनगर मायक्रो कंटेन्मेंट झोन

प्रतिनिधी/ गोडोली

सातारा शहरातील रविवार पेठ, भाजी मंडईलगत, स्वातंत्र्य सैनिकनगर येथे कोरोना रुग्ण आढळून आल्याने पुढील आदेशापर्यंत सैनिकनगर हा भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला असून या परिसरास सील करुन तिथे मनाई आदेश जारी केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा इन्सिटंट कमांडर, सातारा मिनाज मुल्ला यांनी  दिली.  

   संबंधित पोलीसस्टेशनचे प्रमुख या भागाच्या हद्दी प्रतिबंधित (सील) करतील. तालुक्यातील या बाधित क्षेत्रातील सातारा नगरपरिषदेच्या आपत्कालीन सेवा व जीवनावश्यक वस्तुंच्या सेवा व पुरवठा वगळता अन्य व्यक्तींना या प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) मध्ये प्रवेश करण्यास व परिसरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात आली आहे. कंटेनमेंट झोन जाहीर केलेल्या क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा, वस्तु पुरवठा करण्याकरिता वेळ ही जिल्हाधिकारी, सातारा यांनी यापूर्वीच ठरवून दिलेली आहे.  या परिसरात जीवनावश्यक वस्तुंचा, अत्यावश्यक सेवा पुरविणारे कार्यालय, व्यक्तींना  व त्यांच्या वाहनांना यामधून वगळण्यात येत आहे.

  जीवनावश्यक वस्तु सेवा (दूध, दुग्धोत्पादन, किराणा माल, फळे व भाजीपाला इ. यांच्या वाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध नसून त्यासाठी वाहतूक पास उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा यांनी वितरीत करावेत. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दुध, भाजीपाला, औषधे, किराणा माल इत्यादी वस्तू घरपोच करण्यात याव्यात. याचे नियोजन शहरामध्ये मुख्याधिकारी, नगर परिषद, सातारा यांनी स्वतंत्रपणे करावे. त्यावर तहसीलदार, सातारा यांनी योग्य ते नियंत्रण ठेवावे. प्रतिबंधित क्षेत्रामधील सर्व नागरिकांना आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करण्याबाबत मुख्याधिकारी, सातारा नगर परिषद यांनी कार्यवाही करावी. त्यावर तहसीलदार सातारा यांनी योग्य ते नियंत्रण करावे.

   कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियुक्त अधिकारी / कर्मचारी, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायोजनांचे काम करणारे तसेच नगरपरिषद अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत असलेले सर्व कर्मचारी व त्यांची वाहने तसेच शासकीय व अन्य अत्यावश्यक सेवा देण्यात येणाया वाहनांना सदरच्या आदेशानुसार वगळण्यात येत आहे.

Related Stories

सातारा : कर्मचाऱ्यांनी “विशेष कोरोना यंत्रणेला” सहकार्य करावे : मनोज जाधव

Archana Banage

सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क, रूमाल बंधनकारक : जिल्हाधिकारी

Archana Banage

दिवाळी अंकातून तरुण भारत’ने वाचकांची अभिरूची वाढविण्याचे काम केले – प्र-कुलगुरू

Archana Banage

सेनेचे 10 खासदारही बंडखोरीच्या तयारीत, भाजप खासदाराचा दावा

datta jadhav

राष्ट्रीय स्तरावर विरोधकांच्या आघाडीबाबत अजून चर्चा नाही

Patil_p

सातारा : दहिवडी शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

Archana Banage