Tarun Bharat

रविवार पेठेत भरदिवसा चोरटय़ांचा थरार

युवकांच्या सतर्कतेमुळे चोरटे ताब्यात : अर्धा पाऊण तास सुरु होता थरार

प्रतिनिधी/ सातारा

एकीकडे कोरोनाचे संकट डोक्यावर घोंगावत असताना साताऱयातील रविवार पेठेत कोरोनाची माहिती घेण्याचा बहाणा करत ज्येष्ठ नागरिकाच्या घरात घुसून त्याला एअरगनचा धाक दाखवून जखडून ठेवणाऱया एका महिलेसह, दोन चोरटय़ांना पेठेतील सतर्क नागरिक, महिला, युवकांनी शिताफीने पाठलाग करुन पकडले. सुमारे अर्धा पाऊण तास हा थरार सुरु होता. तोपर्यंत चोरटय़ांना नागरिकांचा बेदम मार खावा लागला. त्यानंतर पोलीस आल्यावर चोरटय़ांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेले तिघेजण पुण्याचे असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम शहर पोलिसांत सुरू होते.

साताऱयात सध्या घरफोडय़ांसह दुचाकी चोऱयांचे सत्र वाढले आहे. बंद घर दिसले फोडायला चोरटे मागेपुढे पहात नाहीत. मात्र शुक्रवारी भरदिवसा दुपारी 1 च्या दरम्यान रविवार पेठेतील श्रीकांत विठोबा बिलमपल्ली या ज्येष्ठ नागरिकाच्या घरात कोरोनाची माहिती घेण्याचा बहाणा करत दोन युवक व एक महिला घुसली. घरात घुसताच युवकांनी बिल्लमपल्ली यांना कोचवर ढकलत त्यांचा गळा आवळला. या चोरटय़ांकडे एअरगन होती. त्याचाही धाक ते दाखवत होते.

यावेळी बिल्लमपल्ली यांनी आरडाओरडा केला. तेव्हा त्यांच्या घरातील तसेच आसपासच्या नागरिक हा आरडाओरडा ऐकून बाहेर आले. तेव्हा त्यांना काहीतरी घडत असल्याचे दिसले. मात्र, नागरिक येताच चोरटय़ांनी पळ काढत धुम ठोकली. मात्र त्यातील महिलेला पाठलाग करत युवकांनी पकडले. तोपर्यंत इतर दोन चोरटे दिशा दिसतील तिकडे पळत सुटले होते. त्यांच्या पाठीमागे रविवार पेठेतील युवक लागले होते.

तोपर्यंत रविवार पेठेत जय भवानी स्टीलसमोर मोठी गर्दी जमली होती. त्यात चोरटय़ा महिलेला दोन युवक पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ती झुकांडय़ा देवू लागली. कोरोनाचा सर्व्हेसाठी आल्याचे ती सांगत होती. मग युवक तिला तू पळून का चाललीस असे विचारत होते. तोपर्यंत काहींनी पोलीस ठाण्यात फोनही केला होता. मात्र, घटनास्थळी पकडलेली चोर महिला ऐकतच नसल्याने युवकांनी चांगलीच कानफडली तर ती त्यांच्या अंगावर जात होती. शेवटी पेठेतील महिलांनी तिला चांगला प्रसाद देत पायऱयांवर बसण्यास भाग पाडले.

तोपर्यंत परिसरात बघ्यांची तोबा गर्दी झाली होती. नेमके काय चालले आहे ते कोणाला कळत नव्हते. पोलीस तातडीने येतील हा प्रकार संपेल असे वाटत होते मात्र अर्धा तास उलटून गेला तरी पोलीस येत नव्हते. तोपर्यंत पेठेतील काही युवक चोरटय़ांचा पाठलाग करत त्यांच्या मागे होते. त्यातील एकाला पकडून त्यांनी पेठेत आल्यावर मग जमावाने चांगलीच धुलाई करत त्याला महिलेच्या शेजारी बसवून ठेवले. तोपर्यंत मग स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तिथे दाखल झाले होते.

या दोन चोरटय़ांना घेवून जात असतानाच तिसरा चोरटा देखील युवकांनी पकडून आणला. या सर्व थरार नाटय़ात परिसरात प्रचंड गर्दी जमली होती. वाहतूक कोंडीही झाली होती.  

कोरोनाची माहिती घेण्याचा बहाणा

भर दिवसात ज्येष्ठ नागरिक श्रीकांत बिल्लमपल्ली यांच्या घरात घुसून चोरटय़ांनी कोरोनाची माहिती घेण्यासाठी आलो असल्याचे सांगत त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यांना कोचवर पाडून त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केल्याचे बिल्लमपल्ली यांनी सांगितले. संबंधित महिलेकडे रिव्हॉल्वर असल्याची चर्चाही घटनास्थळी सुरु होती. एकूण चार चोरटे होते. त्यापैकी तीन हाती लागले आहेत. खूप वेळ सुरु असलेले हे थरारनाटय़ पोलीस चोरटय़ांना घेवूननंतर संपले. मात्र दिवसभर या प्रकाराची चर्चा साताऱयात सुरु होती. घटनेचे व्हिडिओ सोशल मिडियावरही झळकत होते.

युवक, नागरिक, महिलांची सतर्कता

शेजारी काय घडले हे शहरात कोणाचे कोणाला माहिती नसते असे म्हटले जाते. मात्र रविवार पेठेत बिल्लमपल्ली यांच्या घरातील आरडाओरडा ऐकून परिसरात असलेले युवक, नागरिक, महिला तातडीने जमा झाले. नागरिक आल्याचे पाहून दोन युवक चोरटय़ांनी पळ काढला. मात्र महिला हाती लागली होती तिची चांगलीच तपासणी महिला व नागरिकांनी केली. तोपर्यंत युवकांनी देखील धाडसाने चोरटय़ांचा पाठलाग करत त्यांना पकडून पुन्हा पेठेत घेवून आले. ही सर्वांची सतर्कता अभिनंदनीय अशीच होती.  

दोन दिवसांपूर्वी देखील आले होते चोरटे

कोरोनाबाबत माहिती हवी आहे, असे सांगून डॉक्टरांचा ऍप्रेन घालून असलेल्या वेशात रविवार पेठेमधील एका घरात घुसलेल्या चोरटय़ांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, हेच चोरटे दोन दिवसांपूर्वी देखील असाच बहाणा करत आले होते. त्यामुळे बिल्लमपल्ली यांच्या कुटुंबातील युवकांसह, नागरिकही सतर्कच होते. दरम्यान, चोरटय़ांनी सोबत एअरगन व ऍसिडची बाटली आणली होती. भरदिवसा कोरोनाची माहिती हवी असल्याचे सांगत दरोडय़ाचा प्रयत्न हा शहरातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यापासून काही मीटर अंतरावर सुरु असलेला हा प्रकार पण पोलिसांना पोहोचण्यास तब्बल अर्धा पाऊण तास लागला.

Related Stories

छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाच्या मालकीचे नाहीत, संजय राऊतांचा टोला

Archana Banage

कसं लढायचं आम्ही ठरवतो मंत्री मुश्रीफांचा चंद्रकांतदादांना टोला

Archana Banage

विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाचे व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचे अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

datta jadhav

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रस्ता रोखो अन् जेलभरो

Patil_p

ज्येष्ठ नागरिक करणार आंदोलन

datta jadhav

उद्धव ठाकरेंनी नैतिकतेच्या गोष्टी करू नये…पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले- देवेंद्र फडणवीस

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!