Tarun Bharat

रवींद्रनाथ टागोरांच्या ‘त्या’ वास्तुची होणार विक्री; खरेदीसाठी ममता सकारात्मक

ऑनलाईन टीम / कोलकत्ता

लंडन शहरात रवींद्रनाथ टागोर यांनी ज्या वास्तूत काही काळ वास्तव्य केले ती इमारत आता विक्रीसाठी तयार आहे. या वास्तूचे महत्त्व भारतासाठी अनन्यसाधारण आहे. कारण १९१२ मध्ये प्रसिद्ध भारतीय कवी रवींद्रनाथ टागोर काही महिन्यांसाठी उत्तर लंडनमधील हॅम्पस्टेड हीथ येथील “ब्लू प्लाक” इमारतीत वास्तव्य केले होते. या वास्तू खरेदीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.

ब्लू प्लाक इमारतीची किंमत २७.३ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, २०१५ मध्ये लंडन दौऱ्यावर असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य सरकारतर्फे रवींद्रनाथ टागोर यांचे निवासस्थान खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यावेळी विकली जाणार न्हवती पण तीची किंमत आता ठरवण्यात आली आहे. या इमारतीवर निळ्या रंगाचा फलक लावण्यात आलेला असून प्रसिद्ध भारतीय कवी रवींद्रनाथ टागोर येथे राहत असत, असं त्यावर लिहिलेलं आहे. हा फलक लंडन कंट्री कौन्सिलने लावली होता. या वास्तूच्या खरेदीसाठी सकारात्मकता दर्शवल्यानंतर ब्रिटीश उद्योगपती स्वराज पॉल यांनी आनंद व्यक्त केलाय. ते म्हणाले की, हे घर भारत सरकार किंवा पश्चिम बंगाल सरकार खरेदी करू शकते. असे ही त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

ISRO PSLV: इस्रोची नवीन ‘गगन भरारी’, ओशनसॅट-३ सह ८ नॅनो सॅटेलाइटचं प्रक्षेपण

Archana Banage

“काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष १० टक्के लाच घेतात”

Archana Banage

स्कूल बस सुरु होईपर्यत करमाफी मिळावी !

Patil_p

सैन्यमाघारीचे अमेरिकेकडून स्वागत

Patil_p

भारतात 45,576 नवे कोरोना रुग्ण; 585 मृत्यू

Tousif Mujawar

सप नेते आझम खान यांची प्रकृती पुन्हा बिघडली

Patil_p